कोरोनाचं संकट कायम, अजून आणखी लाटा येणार, भारतासाठी 6-18 महिने चिंतेचे; WHOच्या शास्त्रज्ञाचा इशारा
भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच भारतीयांच्या चिंतेत भर टाकणारी नवी बातमी आली आहे. (Coronavirus response over next 6-18 months critical, says Soumya Swaminathan)
नवी दिल्ली: भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच भारतीयांच्या चिंतेत भर टाकणारी नवी बातमी आली आहे. भारतात कोरोनाच्या आणखी बऱ्याच लाटा येण्याची शक्यता असून भारतासाठी 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे असल्याचं जागतिक आरोग्य संगघटनेच्या एका शास्त्रज्ञाने सांगितलं आहे. (Coronavirus response over next 6-18 months critical, says Soumya Swaminathan)
जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी द हिंदू या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ही शक्यता वर्तवली आहे. येणाऱ्या काळात भारतात कोरोनाच्या अनेक लाटा येऊ शकतात. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात. कोरोनाच्या लढाईत पुढील 6 ते 18 महिने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं सौम्या यांनी सांगितलं. या व्हायरसचा विकास कसा होतो, त्यावरही बरच काही अवलंबून आहे. व्हेरिएंटसच्या विरोधात व्हॅक्सिनची क्षमता आणि व्हॅक्सिनमुळे होणारी इम्युनिटी किती काळ लोकांचा बचाव करेल, हे खूप महत्त्वाचे राहणार आहे. यात बरंच काही बदलत आहे, असं सौम्या म्हणाल्या.
2021पर्यंत कोरोनाचा अंत होऊ शकतो
कोरोना संसर्गाचा निश्चितच अंत होईल. 2021च्या अखेरपर्यंत कोरोनाचा अंत झालेला आपण पाहू शकू. जगातील 30 टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे मृत्यूचं प्रमाणही कमी होणार आहे, असं सांगतानाच 2022नंतर लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर वेग येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आगामी काळ कठिण
कोरोनाच्या संकटातून आपण सर्वजण जात आहोत. हा कठिण काळ आहे. आपल्याला पुढील 6 ते 12 महिन्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागेल. हा काळ परीक्षेचा असू शकतो. त्यानंतर संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी दीर्घ योजना आखावी लागणार आहे. व्हॅक्सिनपासून होणारी इम्युनिटी आणि कोरोना संसर्गामुळे निर्माण होणारी नैसर्गिक इम्युनिटी कमीत कमी आठ महिने राहते. जसजशी वेळ निघून जाईल, तस तसा आपण अधिक डेटा जमा करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
B1.617 कोरोना अत्याधिक संसर्ग पसरविणारा व्हेरिएंट आहे. व्हेरिएंट्स मूळ रुपाने म्यूटेट किंवा विकसित व्हर्जन असतं. त्यामुळे याचे व्हायरल जीनोममध्ये परवर्तित होतात. ही सामान्य बाब आहे. आरएनए व्हायरस जसजसे मल्टिप्लाय होतात, त्यामुळे व्हायरसला रेप्लिकेट करण्यास मदत मिळते. या व्हायरसमुळे थोडा बदल होतो. ही एक एरर आहे. त्याचं काही खास महत्त्व नाही. हे कोणत्याही परिस्थिती व्हायरसला प्रभावित करत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
व्हॅक्सिन परिणामकारक
भारतातील व्हॅक्सिन कोरोनाच्या नव्या स्ट्रेन विरोधात परिणामकारक ठरली आहे. अर्थात काही घटनांमध्ये दोन डोस घेणाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. काही लोकांना अॅडमिटही करावं लागलं आहे. काही प्रकरणात असं होतं, यात काही विशेष नाही. कारण कोणतीच व्हॅक्सिन शंभर टक्के संरक्षण करू शकत नाही. परंतु, दोन डोस घेतलेले अनेक लोक या घातक आजारापासून बचावले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Coronavirus response over next 6-18 months critical, says Soumya Swaminathan)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 17 May 2021 https://t.co/pMmW2GGGNq #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2021
संबंधित बातम्या:
Maharashtra Coronavirus LIVE Update : उस्मानाबाद जिल्हा कारागृहात तब्बल 133 कैदी कोरोना पॉझिटिव्ह
Working Hours | आठवड्याचे सहा दिवस नऊ तासांची शिफ्ट, हृदयरोगाला आमंत्रण, WHO ने बजावले
अहमदनगरमध्ये कोरोनानंतर म्युकर मायकोसिसचं थैमान, तब्बल 61 जणांना संसर्ग, औषधांसाठी नातेवाईकांची वणवण
(Coronavirus response over next 6-18 months critical, says Soumya Swaminathan)