Corona: एकाचं महिलेच्या शरीरात कोरोनाचे दोन वेरिएंटस, रुग्णालयात आल्यावर 5 दिवसात मृत्यू, वैज्ञानिकांचं टेन्शन वाढलं
बेल्जियममधील एका महिलेला कोरोना संसर्ग झाला होता. संबंधित महिलेच्या शरीरात कोरोना विषाणू संसर्गाचे दोन वेरिएंट आढळून आले आणि महिलेचा पुढील पाच दिवसात मृत्यू देखील झाला.
नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्ग सुरु होऊन दीड वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. कोरोना विषाणू संसर्गाची नवनवीन वेरिएंट समोर येत आहेत. बेल्जियममधील एका महिलेला कोरोना संसर्ग झाला होता. संबंधित महिलेच्या शरीरात कोरोना विषाणू संसर्गाचे दोन वेरिएंट आढळून आले आणि महिलेचा पुढील पाच दिवसात मृत्यू देखील झाला. कोरोना संसर्गाचं हे प्रकरण समोर आल्यानंतर शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. एका महिलेच्या शरीरात दोन प्रकारचे वेरिएंट समोर आल्यानंतर कोरोनाचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. (Coronavirus update woman infected with two different variants)
महिलेच्या शरीरात अल्फा आणि बीटा वेरिएंट
ब्लूमबर्गनं दिलेल्या रिपोर्टनुसार 90 वर्षीय महिलेच्या शरीरात एकाच वेळी अल्फा आणि बीटा वेरीएंट आढळून आले. संबंधित महिलेनं कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती. ती घरीच राहून कोरोनावरील उपचार घेत होते. महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर तिला मार्च महिन्यात ओएलवी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिची कोरोना चाचणी करण्यात आली त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सुरुवातीला महिलेच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी चांगली दिसून येत होती. मात्र, नंतरच्या काळात तिची पकृती बिघडत गेली आणि पाचव्या दिवशी तिचा मृत्यू झाला. बेल्जियममधील महिलेच्या मृत्यूचं प्रकरण समोर आल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लस घेणं किती गरजेचं आहे हे समोर आलं आहे. रुग्णालय प्रशासनानं त्या महिलेला कोरोनाच्या कोणत्या वेरिएंटचा संसर्ग झाला होता याचा शोध घेतला असता तिच्या शरीरा अल्फा आणि बिटा वेरिएंट आढळून आले. अल्फा वेरिएंट हा सर्वप्रथम ब्रिटनमध्ये तर बिटा वेरिएंट दक्षिण आफ्रिकेत समोर आला होता. वैज्ञानिकांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
तज्ज्ञांना काय वाटतं
ओएलवी रुग्णालयातील मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट आणि ऐनी वेंकीरबर्गन यांनी या प्रकरणी बोलताना संबंधित महिला रुग्णालायत दाखल झाली होती त्यावेळी बेल्जियममध्ये दोन्ही वेरिएंटच्या लाटेचा प्रादुर्भाव होता, असं सांगितलं. त्या महिलेला दोन वेरिएंटचा संसर्ग वेगवेगळ्या व्यक्तींकडून झाला असू शकतो, असं देखील त्यांनी म्हटलं.ओएलवी रुग्णालयानं या प्रकरणी अधिक तपासासाठी नमुने युरोपियन काँग्रेस ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीजकडे पाठवण्यात आले आहेत.
जानेवारी महिन्यात ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या देशात एकाच वेळी अनेक रुग्णांना कोरोनाच्या दोन्ही वेरिएंटचा संसर्ग झाल्याची प्रकरण समोर आल्याचा दावा केला होता. वेंकीरबर्गन यांनी अशा प्रकारची प्रकरण यापूर्वी नजरअंदाज करण्यात आली असल्याचंही म्हटलं. वेंकीरबर्गन यांनी वेरिएंटस ऑफ कंसर्नच्या टेस्टीगंच्या मर्यादा आहेत. वेरिएंटसचं म्युटेशन ओळखण्यासाठी जिनोम सिक्वेंन्सिंगद्वारे ओळखण्यात येते, असंही त्यांनी सांगितलं. तर विषाणूतज्ज्ञ लॉरेस यंग यांनी एखाद्या व्यक्तीच्या शरीरात एका पेक्षा अधिक वेरिएंट आढळनं आश्चर्यकारक नसल्याचं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या:
मुंबईत कोरोना लसीकरणाला वारंवार ब्रेक, तिसरी लाट कशी रोखणार? महापालिकेचा सवाल
नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या का? राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
(Coronavirus update woman infected with two different variants)