Covid : कोरोनाबाबतची मोठी अपडेट, काळजी घ्या… कोरोनामुळे होतोय ‘हा’ आजार; डेथ रेट वाढण्याची शक्यता

देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकंवर काढलं आहे. खासकरून केरळ, महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे न्यूमोनिया होतानाही दिसत आहे.

Covid : कोरोनाबाबतची मोठी अपडेट, काळजी घ्या... कोरोनामुळे होतोय 'हा' आजार; डेथ रेट वाढण्याची शक्यता
COVID-19Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 1:57 PM

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण देशात कोरोनाचं संकट कायम आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी संकट टळलेलं नाही. प्रत्येकवेळी कोरोना नवनव्या स्वरुपात येत असल्याने वैद्यकीय क्षेत्रासमोरही आव्हान निर्माण झालं आहे. तब्बल आठ महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या आठ महिन्यानंतर चार हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार झाली आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अधिकच चिंता वाढत आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचा व्हायरस प्रचंड वाढला आहे. त्यामुळे अधिकच धोका निर्माण झाला आहे.

या तिन्ही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालयातील संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे काही रुग्णांमध्ये न्यूमोनियाची लक्षणं दिसत आहेत. कोरोनामुळे न्यूमोनिया होत असल्याचं उघड झालं आहे. फुफ्फुसात संसर्ग झाल्याने न्यूमोनिया होतो. वेळेत उपचार झाले नाही तर त्यामुळे प्राणही जाऊ शकतो. कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यावेळी न्यूमोनियामुळेच अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा काही रुग्णांमध्ये न्यूमोनियाचीच लक्षणे दिसत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि जुना आजार असणाऱ्यांमध्ये या आजाराची लक्षणे अधिक दिसत आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

दुर्लक्ष करू नका

काही रुग्णांमध्ये बॅक्टेरियल न्यूमोनियाची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे हॉस्पिटलायझेशन वाढवावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजार असलेले रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. ऑक्सिजनची लेव्हल कमी आणि यकृतातील संसर्गाच्या केसेस येत नाहीये. मात्र तरीही ज्या प्रकारे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावरून सतर्क झाले पाहिजे. व्हायरस म्यूटेट होत आहे. सातत्याने नवा व्हेरिएंट येत आहे. व्हेरिएंट वेगाने फैलावत आहे. त्यामुळे कोविडकडे दुर्लक्ष करता कामा नये, असं एम्सच्या क्रिटीकल केअर डिपार्टमेंटचे प्रोफेसर डॉ. युद्धवीर सिंह यांनी सांगितलं.

डेथ रेट का वाढतोय?

कोरोनामुळे रुग्णांचं दवाखानम्यात भरती होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, डेथ रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता नाही. शिवाय रुग्णांमधील ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याच्या केसेसही आलेल्या नाहीत. त्यामुळे डेथ रेट वाढण्याची शक्यता नाहीये. ज्या लोकांना आधीपासूनच कॅन्सर, एड्स, टीबी आणि लिव्हर तसेच किडनीच्या आजाराने झुंजणाऱ्यांना कोरोनाचा अधिक धोका आहे. अशा रुग्णांना वेळेत उपचार करणं आणि काळजी घेणं गरजेचं आहे, असं डॉ. सिंह यांनी सांगितलं.

संरक्षण कसं करायचे?

सर्व लोकांनी पुन्हा एकदा मास्कचा वापर केला पाहिजे. त्यामुळे व्हायरसपासून संरक्षण मिळेल. ऑफिसला जाताना किंवा बाहेर जाताना मास्क लावूनच गेलं पाहिजे. तुम्हाला जर दमा, ब्रोंकायटिस किंवा सीओपीडीचा त्रास असेल तर मास्कपासूनच संरक्षण मिळेल. ज्येष्ठ नागरिकांनीही मास्क वापरणे बंधनकारक आहे. कारण कोरोनाचा व्हायरस वेगाने वाढत आहे. त्यामुळे रिस्क नको म्हणून ही काळजी घेतली पाहिजे, असं डॉ. जुगल किशोर यांनी सांगितलं.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.