Corona Cases In India | तिसरी लाट याच महिन्यात येणार, महाराष्ट्र, केरळात रुग्णसंख्या वाढणार?; वाचा अहवाल काय सांगतो?

कोरोनाची तिसरी लाट या महिन्यातच येणार आहे. तसेच ऑक्टोबरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आयआयटी हैदराबाद आणि कानपूरच्या तज्ज्ञांनी गणिती आकडेवारीच्या माध्यमातून ही भविष्यवाणी केली आहे. ( third wave of corona)

Corona Cases In India | तिसरी लाट याच महिन्यात येणार, महाराष्ट्र, केरळात रुग्णसंख्या वाढणार?; वाचा अहवाल काय सांगतो?
CORONA
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 12:16 PM

नवी दिल्ली: कोरोनाची तिसरी लाट या महिन्यातच येणार आहे. तसेच ऑक्टोबरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आयआयटी हैदराबाद आणि कानपूरच्या तज्ज्ञांनी गणिती आकडेवारीच्या माध्यमातून ही भविष्यवाणी केली आहे. तसेच महाराष्ट्र आणि केरळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांतील रुग्णसंख्येवरच कोरोना रुग्णांची संख्या किती वाढेल हे स्पष्ट होणार असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. (Covid third wave likely this month, may peak in October)

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ही भविष्यवाणी गणिताच्या मॉडलनुसार करण्यात आली आहे. आयआयटी हैदराबाद आणि कानपूरचे तज्ज्ञ मधुकुमल्ली विद्यासागर आणि मनिंद्र अग्रवाल यांनी ही भविष्यवाणी केली आहे. या तज्ज्ञांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला होता. तो तंतोतंत खरा ठरला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशात गेल्या 24 तासात 17, 06, 598 लोकांना कोरोनाची व्हॅक्सीन टोचण्यात आली आहे. आतापर्यंत 47,22,23,639 लोकांना व्हॅक्सिन टोचण्यात आली आहे.

तिसरी लाट धोकादायक नाही

तज्ज्ञांच्या मते कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेसारखी घातक नसेल. मात्र, तरीही सावधानता बाळगावी लागणार आहे. तिसऱ्या लाटेत रोज एक लाखाहून अधिक कोरोना रुग्ण सापडू शकतात. परिस्थिती बिघडली तर हा आकडा दीड लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेत दररोज कोरोनाचे 4 लाखाहून अधिक रुग्ण सापडत होते. मात्र, 7 मे नंतर ही संख्या हळूहळू कमी झाली. महाराष्ट्र आणि केरळासह ज्यादा रुग्णसंख्या वाढणाऱ्या राज्यांवर कोरोनाचे रुग्ण किती वाढणार हे अवलंबून असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 16 लाख 95 हजार 958 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 8 लाख 57 हजार 467 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 24 हजार 773 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 13 हजार 718 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 47 कोटी 22 लाख 23 हजार 638 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Covid third wave likely this month, may peak in October)

संबंधित बातम्या:

निर्बंध शिथिल करण्यावर एकमत नाही; आता मुख्यमंत्रीच निर्णय घेणार: विजय वडेट्टीवार

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी घट, अ‍ॅक्टिव्ह केसेस मात्र वाढत्याच

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 41 हजारांवर, अ‍ॅक्टिव्ह केसेस वाढत्याच

(Covid third wave likely this month, may peak in October)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.