मुलांच्या लसीकरणावेळी या 5 गोष्टी करा, दुष्परिणामांपासून संरक्षण मिळवा

12-14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. त्यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला जाणार असून दुसरा डोस 28 दिवसांनी घेतला जाईल. लस घेतल्यानंतर अंगदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या यांसारखी किरकोळ लक्षणे दिसून येत असतात.

मुलांच्या लसीकरणावेळी या 5 गोष्टी करा, दुष्परिणामांपासून संरक्षण मिळवा
मुलांना कोविड-19 लस मिळण्यास सुरुवात झाली आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 9:58 AM

भारतात 16 मार्चपासून, 12-14 वर्षे वयोगटातील मुलांना कोविड-19 लस मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना कोरोना लसीचा (Covid-19 vaccine)पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच दुसरा डोस 28 दिवसांनी घेतला जाईल. आतापर्यंत फक्त 15 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच कोरोनाची लस दिली जात होती. मुलांना ‘कॉर्बेवॅक्स’(Corbevax vaccine) लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लसीकरण करण्यासाठी कोवीन (Cowin) पोर्टल किंवा आरोग्य सेतू मोबाईल अॅपवर नोंदणी करता येईल. लसीकरण केंद्रावरही मुले नोंदणी करू शकतात. लसीकरण केल्याने कोरोनामुळे गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका कमी होतो. जगभरातील अनेक देशांमध्ये लहान मुलांसाठी लसीकरण फार पूर्वीपासून सुरू झाले आहे. लसीकरणानंतर अनेकदा काही किरकोळ लक्षणे दिसून येत असतात. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने काही सूचना केल्या आहेत, ज्याद्वारे लसीच्या दुष्परिणामांना अधिक चांगल्या प्रकारे सामना करता येईल.

मुलांशी लसीबाबत चर्चा करा

वेदनांमुळे मुलांना नेहमीच लसीकरण करण्याची भीती वाटत असते. परंतु लसीकरणाशिवाय सध्या कोरोनापासून संरक्षण करण्याचे दुसरे कुठलेही माध्यम नाही. मुलांना लसींचे फायदे सांगा, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना लसीकरणासाठी तयार करा.

डॉक्टरांशी बोला

तुम्हाला लसीकरणाबद्दल काही प्रश्न असल्यास, तुमच्या डॉक्टरांना विचारा. तुमचे डॉक्टर तुम्हाला लसीबद्दल संपूर्ण माहिती देऊ शकतात. हे तुम्हाला लसीचे फायदे आणि दुष्परिणाम समजण्यास मदत करू शकतात.

दुष्परिणामांबद्दल जाणून घ्या

काहीवेळा मुलांनी लस घेतल्यानंतर किरकोळ दुष्परिणाम होऊ शकतात, ज्यात इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणे, पुरळ किंवा ताप यांचा समावेश होतो. या प्रतिक्रिया सामान्य असून याचा फार काळ त्रास होत नाही. तुमच्या डॉक्टरांकडून यासंबंधी संपूर्ण माहिती मिळवा.

दुष्परिणामांचा सामना कसा करावा

लसीकरणानंतर जाणवणाऱ्या लक्षणांचा सामना करण्यासाठी डॉक्टरांकडून संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. इंजेक्शन दिलेल्या भागावर लालसरपणा, वेदना किंवा सूज येऊ शकते. त्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला थंड आणि ओलसर कापड वापरण्याचा सल्ला देऊ शकतात.

ताप आल्यास हे करा

लस दिल्यानंतर मुलाला सौम्य किंवा जास्त ताप येऊ शकतो. त्यास सामोरे जाण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणानंतर शरीर ‘हायड्रेटेड’ ठेवा. लसीकरणानंतर 24 तासांत अन्न न जाणे हे सामान्य आहे. मुलाला नॉन-एस्पिरिन वेदनाशामक औषध देऊ शकता का? ते तुमच्या डॉक्टरांना विचारा. काळजी करण्यासारखे काही वाटल्यास डॉक्टरकडे जा.

(टीप : सदर मजकूर उपलब्ध माहितीवर आधारीत आहे. याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

होळीमध्ये गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

Skin Care : होळी खेळल्यानंतर त्वचेवर अ‍ॅलर्जी होते? मग हे 5 उपाय नक्कीच कामी येतील!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.