कोंड्यामुळे डोळे, भुवयांवर परिणाम होऊ शकतो, ‘हे’ उपाय करा
कोंडा केवळ केसांमध्येच नाही, तर डोळे आणि भुवयांमध्येही होतो, हे तुम्हाला माहिती आहे का. यामुळे तुमची दृष्टी देखील जावू शकते. थंडीत कोंड्याची समस्या ऐरणीवर येते. कोंडा आपल्या डोळ्यांवर आणि भुवयांवर देखील होऊ शकतो. यावरचे उपाय जाणून घ्या.
तुम्ही कोंड्यामुळे टेन्शन घेत आहात का? चिंता करू नका. यावर आम्ही आज उपाय सांगत आहोत. थंडीत कोंड्याची समस्या ऐरणीवर येते. कोंडा आपल्या डोळ्यांवर आणि भुवयांवर देखील होऊ शकतो. कोंडा केवळ केसांमध्येच नाही, तर डोळे आणि भुवयांमध्येही होतो, हे तुम्हाला माहिती आहे का. यावरच आम्ही आज माहिती सांगणार आहोत.
कोंडा आपल्या डोळ्यांवर आणि भुवयांवर देखील होऊ शकतो. याला पापण्यांवर जमा होणारे ‘ब्लेफेराइटिस’ म्हणतात, ज्यामुळे डोळ्यांच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळे केवळ खाज सुटणे आणि चिडचिड होत नाही तर दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास संसर्ग आणि डोळ्यांची जळजळ यासारख्या परिस्थिती देखील उद्भवू शकतात.
कोंडा आपल्या डोळ्यांवर आणि भुवयांवर झाल्यास ते हलक्यात घेऊ नये, असं तज्ज्ञ सांगतात. कारण, यामुळे डोळे आणि त्वचेच्या आरोग्यास गंभीर नुकसान होऊ शकते. योग्य माहिती आणि सावधगिरी बाळगल्यास ते सहज टाळता येते.
पापण्यांवर कोंडा येणं म्हणजे काय?
पापण्यांवरील कोंडा याला वैद्यकीय भाषेत ब्लेफेरिटिस म्हणतात. सोप्या भाषेत म्हणजे पापण्यांच्या पायथ्याशी पांढरे कवच जमा होणे होय. सिंगापूर आणि भारतातील अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पापण्यांवर जीवाणूंचे प्रमाण जास्त असल्यास किंवा तेलग्रंथी बंद पडल्यास ही समस्या उद्भवते.
डोळ्यावर कोंडा येण्याची लक्षणे काय आहेत?
पापण्यांवर पांढरे कवच येणे डोळ्यांची जळजळ व खाज येणे पापण्यांना चिकटणे
कोणती समस्या धोकादायक?
सर गंगाराम हॉस्पिटलचे डॉ. एस.एन. झा स्पष्ट करतात की, पापण्यांवरील कोंडा डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. यामुळे डोळ्यांची जळजळ, संसर्ग आणि कॉर्नियाचे नुकसान देखील होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, जे लोक कॉन्टॅक्ट लेन्स घालतात त्यांना या समस्येचा त्रास होऊ शकतो.
उपाय काय करावे?
पापण्या नियमित स्वच्छ करा. जुना मेकअप वापरू नका. झोपण्यापूर्वी डोळ्यांचा मेकअप काढून टाका. डोक्याच्या कोंड्यावर उपचार करा, कारण त्याचा परिणाम पापण्यांवरही होऊ शकतो.
भुवयांवरील कोंडा टाळण्याचे उपाय कोणते?
भुवयांवर कोंडा होण्याची समस्या वाढू शकते. हे टाळण्यासाठी आणि खाज सुटणारी उत्पादने टाळण्यासाठी मॉइश्चरायझर वापरा. कोंड्याच्या समस्येला हलक्यात घेऊ नका. योग्य ती काळजी आणि वेळीच उपचार केल्यास तुम्ही ही समस्या टाळू शकता.
डोळ्यांच्या गंभीर समस्या
कोंडा आपल्या डोळ्यांवर आणि भुवयांवर देखील होऊ शकतो. याला पापण्यांवर जमा होणारे ‘ब्लेफेराइटिस’ म्हणतात, ज्यामुळे डोळ्यांच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.