Health | थेमीस मेडिकेयरच्या वायरालेक्सला डिसीजीआयची मान्यता…

वायरालेक्स हे तोंडावाटे घेण्याचे औषध असून नोंदणीकृत वैद्यकीय प्रॅक्टिशनरकडून रीतसर प्रिस्क्रिप्शन असेल तरच हे औषध मिळते. इनोसिन प्रॅनोबेक्स हे विषाणूविरोधी कृती करणारे इम्युनोमॉड्युलेटरी एजंट आहे आणि याची सुरक्षितता सिद्ध करण्यात आली आहे.

Health | थेमीस मेडिकेयरच्या वायरालेक्सला डिसीजीआयची मान्यता...
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 6:00 AM

मुंबई : सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविडवरील तसेच श्वसनमार्गाला होणाऱ्या गंभीर विषाणू (Virus) संसर्गावरील उपचारांसाठी वायरालेक्स हे प्रभावी आणि सुरक्षित औषध आहे. या औषधाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची (डिसीजीआय) मान्यता मिळाली आहे. कोरोनाचे (Corona) नवे व्हेरियंट्स आले असले तरी हे औषध प्रभावी ठरेल, असा दावाही करण्यात आला आहे. भारतात करण्यात आलेल्या डबल-ब्लाइंड, रँडमाइज्ड प्लेसीबो कंट्रोल चाचणीनंतर हे औषध सुरक्षित (Safe) आणि प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रोगमुक्त करण्याचा वेग जास्त

या औषधाच्या क्लीनिकल प्रतिक्रियेचा व रोगमुक्त करण्याचा वेग जास्त असल्याचे यामध्ये दिसून आले. कोविड 19 च्या डेल्टा लाटेच्या काळात या तपासण्या करण्यात आल्या होत्या आणि ज्या रुग्णांना वायरालेक्स औषध दिले गेले त्यांची आजाराची लक्षणे लवकर आणि संपूर्णपणे दूर झाली. वायरालेक्स हे औषध फक्त कोविड 19 वर नाही तर श्वसनमार्गाच्या इतर विषाणू संसर्गांवर देखील प्रभावी आहे. १८ ते 75 वयोगटातील भारतीय रुग्णांवर या क्लिनिकल चाचण्या करण्यात आल्या असून भारतातील 11 केंद्रांवर याचा अभ्यास करण्यात आला आहे.

वायरालेक्स हे तोंडावाटे घेण्याचे औषध

वायरालेक्स हे तोंडावाटे घेण्याचे औषध असून नोंदणीकृत वैद्यकीय प्रॅक्टिशनरकडून रीतसर प्रिस्क्रिप्शन असेल तरच हे औषध मिळते. इनोसिन प्रॅनोबेक्स हे विषाणूविरोधी कृती करणारे इम्युनोमॉड्युलेटरी एजंट आहे आणि याची सुरक्षितता सिद्ध करण्यात आली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये विषाणू संसर्गांवरील उपचारांमध्ये याचा प्रभावी वापर केला जात आहे. भारतात थेमीस मेडिकेयर लिमिटेडने केलेल्या काटेकोर डबल-ब्लाइंड रँडमाइज्ड नियंत्रित क्लीनिकल चाचण्यांमधून हाती आलेल्या परिणामांनंतर हे औषध कोविड 19 वरील उपचारांसाठी वापरले जाऊ लागले आहे.

हे सुद्धा वाचा

रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासही होते मदत

सौम्य ते मध्यम तीव्रतेच्या कोविड 19 आणि इतर विषाणू/श्वसनमार्गाच्या संसर्गावरील उपचारांमध्ये वायरालेक्स त्याच्या इम्युनोमॉड्युलेटरी व विषाणूविरोधी गुणधर्मांसह काम करते, हे गुणधर्म शरीराची नैसर्गिक व ऍडाप्टिव रोग प्रतिकारशक्ती वाढवून विषाणू संसर्गाच्या विरोधात शरीराची संरक्षण क्षमता वाढवतात. रोग प्रतिकारशक्तीला प्रोत्साहन मिळाल्यामुळे रुग्णाला आजाराच्या लक्षणांपासून लवकर बरे वाटते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.