दिल्ली-मुंबईत मार्च-एप्रिलनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद; देशात कोरोनाला ब्रेक

गेल्या काही महिन्यांपासून देशातील कोरोनाचा कहर अत्यंत कमी झाला आहे. जवळपास सर्वच राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचं प्रमाण घटलं आहे. (Delhi, mumbai reports less than 500 Covid-19 cases, lowest in over 7 months)

दिल्ली-मुंबईत मार्च-एप्रिलनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद; देशात कोरोनाला ब्रेक
coronavirus
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 10:54 AM

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून देशातील कोरोनाचा कहर अत्यंत कमी झाला आहे. जवळपास सर्वच राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचं प्रमाण घटलं आहे. राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोनाचे 424 रुग्ण सापडले आहेत. गेल्या सात महिन्यातील ही सर्वात कमी संख्या आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर मुंबईत अवघ्या तिघांचा मृत्यू झाला आहे. मार्च-एप्रिलनंतरची ही देशातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. मुंबई-दिल्लीसह देशातील सर्वच राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. (Delhi, mumbai reports less than 500 Covid-19 cases, lowest in over 7 months)

मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाचे केवळ 581 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 2,95,241 वर गेली आहे. तसेच गेल्या 24 तासांत केवळ तिघांचाच मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या 11,135 झाली आहे. मार्च-एप्रिलनंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे. शिवाय मुंबईतील कंटेन्मेंट झोनची संख्याही कमी करण्यात आली असून मुंबईची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यात 35 रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात रविवारी कोरोना संसर्गाचे एकूण 3,282 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 19,42,136 एवढी झाली आहे. राज्यात कोरोनामुळे 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या 49,666 एवढी झाली आहे. तर, राज्यातील बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 18,36,999 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 54,317 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिल्लीतही रुग्णसंख्या घटली

राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोनाचे 424 रुग्ण सापडले आहेत. गेल्या सात महिन्यातील ही सर्वात कमी संख्या आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत सध्या 6.26 लाखाहून अदिक रुग्ण आहे. या आजारामुळे आतापर्यंत 10 हजार 585 लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिल्लीत कोरोनाचे 494 रुग्ण आढळले होते. 21-23 डिसेंबरपासून दररोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराहून कमी आहे.

21 डिसेंबर रोजी 803, 22 डिसेंबर रोजी 939 आणि 23 डिसेंबर रोजी 871 रुग्ण सापडले होते. 24 डिसेंबर रोजी 1063 नवे रुग्ण सापडले. त्यानंतर 25 डिसेंबर रोजी ही संख्या कमी होऊन 758 आणि 26 डिसेंबर रोजी 655 रुग्ण आढळले आहेत. 27 डिसेंबर रोजी 757 रुग्ण आढळले होते, तर 28 डिसेंबर रोजी एकाच दिवशी 564 रुग्ण आढळून आले होते. गेल्या पाच महिन्यांपेक्षा ही रुग्णसंख्या सर्वाधिक कमी आहे. 29 आणि 30 दिल्लीत क्रमश: 703 आणि 677 रुग्ण सापडले आहेत. तर 31 डिसेंरब रोजी 574 रुग्ण सापडले होते. तर 2021च्या पहिल्याच दिवशी दिल्लीत 585 रुग्ण सापडले आहेत. (Delhi, mumbai reports less than 500 Covid-19 cases, lowest in over 7 months)

संबंधित बातम्या:

महाराष्ट्र कोरोना लसीकरणासाठी सज्ज, ड्रग्ज कंट्रोलच्या परवानगीची प्रतीक्षा: राजेश टोपे

कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला लसीच्या आपत्कालीन वापराला अखेर परवानगी

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार, किती धोकादायक, आता पुढे काय?

(Delhi, mumbai reports less than 500 Covid-19 cases, lowest in over 7 months)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.