चुकीच्या सवयींमुळे वाढतोय डिमेंशिया, या टिप्स अवश्य ठेवा ध्यानात
तणाव हा एक प्रमुख घटक आहे जो तुम्हाला स्मृतिभ्रंश होण्याचा धोका निर्माण करू शकतो. संशोधनात असे आढळून आले आहे की मध्यम जीवनातील तणावामुळे वृद्धापकाळात स्मृतिभ्रंश होऊ शकतो.
मुंबई : आजकाल लोकं अनेक प्रकारच्या समस्यांना सतत बळी पडत आहेत. या व्यस्त जीवनात अनेक जण केवळ शारिरीकच नव्हे तर मानसिक समस्यांनाही बळी पडत आहेत. आजकाल बरेच जण मानसिक आरोग्याशी संबंधित विविध समस्यांशी झुंजत आहेत, ज्यामुळे लोकांच्या मानसिक कार्यावर खोलवर परिणाम होत आहे. परिणामी स्मृतिभ्रंशाची (Dementia) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. या आजाराची प्रकरणे दिवसोंदिवस वाढतच आहेत. स्मृतिभ्रंश हा शारिरीक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या विनाशकारी विकार आहे, जो जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करतोय.
स्मृतिभ्रंश म्हणजे काय?
स्मृतिभ्रंश ही सामान्यतः विस्मरणाची समस्या असते. हे बर्याचदा या स्थितीच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. पण फक्त स्मृती कमी होणे म्हणजे तुम्हाला स्मृतिभ्रंश आहे असे नाही. याची विविध कारणे असू शकतात. तुमचा मेंदू निरोगी ठेवून स्मृतिभ्रंशाचा धोका कमी करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि स्मृतिभ्रंशाचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही या 5 मार्गांचा अवलंब करू शकता.
सुकामेवा खा
तुमचा मेंदू निरोगी आणि तीक्ष्ण बनवण्यासाठी तुम्ही सुकामेवा वगैरे खाऊ शकता. ते आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. दररोज मूठभर काजू खाल्ल्याने मानसिक आरोग्य सुधारण्यास देखील मदत होते आणि वृद्धांमध्ये संज्ञानात्मक आरोग्य सुधारते आणि विचार, तर्कशक्ती तसेच स्मरणशक्ती सुधारते, ज्यामुळे स्मृतिभ्रंश टाळण्यास मदत होते.
रक्तदाब योग्य ठेवा
अनियंत्रित रक्तदाबामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत प्रत्येक वयात बीपी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की वृद्धापकाळात रक्तदाब नियंत्रणात ठेवल्याने संज्ञानात्मक नुकसान होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते, जे डिमेंशियाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. तीन वर्षे सतत बीपी कमी केल्याने मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो.
स्ट्रेस मॅनेजमेंट
तणाव हा एक प्रमुख घटक आहे जो तुम्हाला स्मृतिभ्रंश होण्याचा धोका निर्माण करू शकतो. संशोधनात असे आढळून आले आहे की मध्यम जीवनातील तणावामुळे वृद्धापकाळात स्मृतिभ्रंश होऊ शकतो. अभ्यासात असेही आढळून आले की दीर्घकाळापर्यंत वाढलेली कोर्टिसोल पातळी देखील घातक ठरू शकते. संशोधकांच्या मते, ज्या लोकांना स्मृतिभ्रंश टाळायचा आहे त्यांनी तणाव कमी करण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
सक्रिय रहा
विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की डिमेंशिया सुरू होण्यास विलंब करण्यासाठी शारीरिक हालचाली उपयुक्त ठरतात. फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ डी जनेरियो (UFRJ) च्या संशोधनात असे म्हटले आहे की व्यायामामुळे स्मरणशक्ती कमी होण्यास मदत करणारे हार्मोन इरिसिनची पातळी वाढते.
पुरेशी झोप घेणे
कमी झोप किंवा अनियमीत झोप यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच तज्ञ पूर्ण झोप घेण्याचा सल्ला देतात. यामुळे स्मृतिभ्रंशाचा धोकाही लक्षणीय वाढतो. पुरेशी झोप न मिळाल्याने मेंदूतील टाऊ नावाच्या प्रथिनाचे प्रमाण वाढते, जे अल्झायमर रोगास कारणीभूत असते.