Dengue During Pregnancy: गर्भावस्थेत घातक ठरू शकतो डेंग्यू, वाचा लक्षणे, उपाय!
डेंग्यूची लक्षणे माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधे आणि स्नायू दुखणे किंवा पुरळ यासारख्या डेंग्यूची कोणतीही लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
मुंबई: डेंग्यू! डासांमुळे होणाऱ्या या आजाराचा झपाट्याने प्रसार होत असताना लोकांनी आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिलांचा यांनी काळजी घ्यायला हवी. गर्भवती महिलांनाच फक्त डेंग्यूचा संसर्ग होण्याचा धोका नसतो तर त्यांच्या सहित नाही येणाऱ्या बाळाला धोका असतो. गर्भातील बाळाच्या मृत्यूसह ही परिस्थिती ओढवू शकते.
पावसाळा काही काळ चालणार असल्याने आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने ताप, शरीरावर पुरळ उठणे, डोळे दुखणे, स्नायू, सांधे किंवा हाडे दुखणे, उलट्या, मळमळ अशा लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवावे. गरोदर मातांसाठी हे महत्वाचे आहे. डास चावण्याचा धोका कमी करण्यासाठी लांब बाजूचा शर्ट आणि लांब पँट घाला.
गरोदर महिलांना डेंग्यूचा धोका का जास्त असतो?
गरोदरपणात वाढत्या गर्भाला आधार देण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीत बदल होतात, ज्यामुळे गरोदर महिलांना डेंग्यूसारख्या संसर्गाचा धोका अधिक असतो. याव्यतिरिक्त, गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदल देखील संक्रमित झाल्यावर रोगाच्या तीव्रतेवर परिणाम करू शकतात. त्याचवेळी, गर्भधारणेदरम्यान डेंग्यूच्या संसर्गामुळे आई आणि बाळ दोघांनाही समस्या उद्भवू शकतात, ज्यात अकाली जन्म, बाळाचे कमी वजन आणि अगदी गर्भाचा मृत्यू देखील समाविष्ट आहे.
डेंग्यूची लक्षणे माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधे आणि स्नायू दुखणे किंवा पुरळ यासारख्या डेंग्यूची कोणतीही लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
डेंग्यूपासून बचाव करण्याचे उपाय
डासांपासून संरक्षण : डास चावण्यापासून प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा. बाहेर पडताना आणि झोपताना डास प्रतिबंधक औषधाचा वापर करा.
पाणी साचणे: डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी पाणी साठवण्याची जागा स्वच्छ ठेवावी. भांडी, कुलर व इतर ठिकाणी पाणी साचू नये म्हणून खबरदारी घ्यावी.
पूर्ण कपडे घाला: वेळेनुसार जास्तीत जास्त पूर्ण कपडे घालण्याचा प्रयत्न करा. डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी आरामदायी आणि लांब स्लीव्हचे कपडे उत्तम आहेत.
घराची स्वच्छता: आपले घर स्वच्छ डेंग्यूसारख्या आजारांची डासांची उत्पत्ती होण्याचा धोका कमी होतो.
पाण्याच्या जागा रिकाम्या ठेवा: पाणी साठवण्याच्या जागा रिकाम्या ठेवा जेणेकरून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता वाढणार नाही.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)