Dengue : पॅरासिटामॉल घेऊन घरी बसू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या ! कोरोनानंतर डेंग्यूचे सावट; आरोग्य अधिकाऱ्यांचा हाय अलर्ट..

पावसाळ्यापूर्वी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्याने उत्तर प्रदेशातील आरोग्य अधिकारी सतर्क झाले आहेत. राज्याचे महासंचालक, आरोग्य, वेदव्रत सिंह म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक वैद्यकीय पायाभूत सुविधा आहेत परंतु प्रतिबंधाची गुरुकिल्ली लोकांच्या हातात आहे.

Dengue : पॅरासिटामॉल घेऊन घरी बसू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या !  कोरोनानंतर डेंग्यूचे सावट; आरोग्य अधिकाऱ्यांचा हाय अलर्ट..
कोरोनानंतर डेंग्यूचे सावट
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 4:56 PM

कोरोनानंतर आता डेंग्यूने डोके वर काढले आहे. पावसाळ्यापूर्वीच डासांमुळे पसरण्यास सुरूवात झाल्याने, उत्तर प्रदेशातील आरोग्य अधिकाऱ्यांनी हाय अलर्ट जारी केला आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव आजकाल शहरापासून ग्रामीण भागात दिसून येत आहे. डेंग्यूशी संबंधित (Related to dengue) बहुतांश चाचण्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये केल्या जात आहेत. केवळ सरकारीच नाही तर खासगी रुग्णालयांमध्येही डेंग्यू आणि तापाचे रुग्ण जास्त आहेत. कोरोनानंतर आता डेंग्यूच्या उपचार आणि तपासणीच्या नावाखाली पुन्हा लोकांचे खिसे रिकामे होत आहेत. सरकारी यंत्रणेकडेही असा कुठलाही मंत्र नाही, ज्यामुळे डेंग्यू लगेच संपेल. लोकांनीही आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डासांपासून स्वतःचे संरक्षण (Self-defense) करण्यासाठी सर्व उपाय करा. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. पाणी साचू देऊ नका. डेंग्यू हा विषाणूजन्य तापही आहे. हा ताप उतरायला तीन ते पाच दिवस किंवा कधी कधी आठ ते दहा दिवस लागतात. त्यामुळे घाबरू नका, सावधगिरी बाळगा (Be careful) आणि धीर धरा.

वैदयकीय तज्ज्ञांनी सांगीतले की, डेंग्यूवर कोणतेही औषध किंवा लस नाही, त्यामुळे डास चावण्यापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जरी हा रोग एखाद्या व्यक्तीस प्रभावित करतो, तरीही वैद्यकीय देखरेखीखाली त्यातून बरे होणे शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले. “ताप कायम राहिल्यास रुग्णाची डेंग्यूची चाचणी करून घ्यावी. निदान झाल्यावर औषधांसोबतच जास्त द्रवपदार्थाचा आहार घ्यावा,” असा सल्ला तज्ज्ञानी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

काय खबरदारी घेता येईल

  • घराभोवती पाणी साचू देऊ नका.
  • भांडी, जुने टायर आणि इतर कंटेनरमधील पाणी बदलत राहा.
  • कूलरचे पाणी आठवड्यातून एकदा बदलावे.
  • झोपताना मच्छरदाणी वापरा.
  • घराच्या खिडक्यांना जाळी किंवा पडदा असावा.
  • सुरक्षित डास प्रतिबंधक उपाय करा.
  • पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.

घरगुती उपाय करू नका

ताप आल्यावर घरगुती उपाय करू नका. पॅरासिटामॉल व्यतिरिक्त कोणतेही औषध स्वतः घेऊ नका. पाणी आणि इतर द्रव प्या. २४ तासांत ताप उतरला नाही तर जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. एलिसा चाचणीची सुविधा दोन्ही राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.