कोरोनानंतर आता डेंग्यूने डोके वर काढले आहे. पावसाळ्यापूर्वीच डासांमुळे पसरण्यास सुरूवात झाल्याने, उत्तर प्रदेशातील आरोग्य अधिकाऱ्यांनी हाय अलर्ट जारी केला आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव आजकाल शहरापासून ग्रामीण भागात दिसून येत आहे. डेंग्यूशी संबंधित (Related to dengue) बहुतांश चाचण्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये केल्या जात आहेत. केवळ सरकारीच नाही तर खासगी रुग्णालयांमध्येही डेंग्यू आणि तापाचे रुग्ण जास्त आहेत. कोरोनानंतर आता डेंग्यूच्या उपचार आणि तपासणीच्या नावाखाली पुन्हा लोकांचे खिसे रिकामे होत आहेत. सरकारी यंत्रणेकडेही असा कुठलाही मंत्र नाही, ज्यामुळे डेंग्यू लगेच संपेल. लोकांनीही आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डासांपासून स्वतःचे संरक्षण (Self-defense) करण्यासाठी सर्व उपाय करा. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. पाणी साचू देऊ नका. डेंग्यू हा विषाणूजन्य तापही आहे. हा ताप उतरायला तीन ते पाच दिवस किंवा कधी कधी आठ ते दहा दिवस लागतात. त्यामुळे घाबरू नका, सावधगिरी बाळगा (Be careful) आणि धीर धरा.
वैदयकीय तज्ज्ञांनी सांगीतले की, डेंग्यूवर कोणतेही औषध किंवा लस नाही, त्यामुळे डास चावण्यापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जरी हा रोग एखाद्या व्यक्तीस प्रभावित करतो, तरीही वैद्यकीय देखरेखीखाली त्यातून बरे होणे शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले. “ताप कायम राहिल्यास रुग्णाची डेंग्यूची चाचणी करून घ्यावी. निदान झाल्यावर औषधांसोबतच जास्त द्रवपदार्थाचा आहार घ्यावा,” असा सल्ला तज्ज्ञानी दिला आहे.
ताप आल्यावर घरगुती उपाय करू नका. पॅरासिटामॉल व्यतिरिक्त कोणतेही औषध स्वतः घेऊ नका. पाणी आणि इतर द्रव प्या. २४ तासांत ताप उतरला नाही तर जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. एलिसा चाचणीची सुविधा दोन्ही राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.