Detox: सणांच्या दिवसात जास्त झालं खाणं ? असे करा शरीराचे डिटॉक्स
सणा-सुदीच्या दिवसांत अधिक तळलेले पदार्थ आणि खूप मिठाई खाल्याने बऱ्याच वेळेस आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं. बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगचा त्रासही होऊ शकतो. अशा वेळी शरीराला डिटॉक्स करण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकतो.
नवी दिल्ली – सणासुदीचे दिवस (festive season)हे चविष्ट पदार्थ आणि मिठाईशिवाय (sweets) अपूर्ण असतात. अशा वेळी बरेचसे लोक तळलेले पदार्थ आणि मिठाई अधिक प्रमाणात खातात. मात्र यामुळे पचनासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी आरोग्य सुधारण्यासाठी शरीराला वेळोवेळी डिटॉक्स (detox)करणे गरजेचे आहे. शरीराला डिटॉक्सिफाय करून चयापचय देखील सुधारते. अनेक प्रकारच्या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. जाणून घेऊयात कोणत्या आहेत या गोष्टी.
लिंबू पाणी – लिंबू पाण्याचे सेवन करावे. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे कार्य करते. याचे सेवन केल्याने ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे लिंबू पाण्याचे सेवन करावे.
दही – दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिआ असतात. ते आतडे स्वस्थ व निरोगी राखण्याचे काम करतात. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही दह्यामुळे मदत होते. दह्याचे सेवन केल्याने ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
फळं – फळांमध्ये अनेक पोषक तत्वं असतात. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स हे मुबलक प्रमाणात असतात. तसेच त्यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्मही असतात. तुम्ही सॅलॅड किंवा ज्यूसच्या स्वरूपात फळांचे सेवन करू शकता. अन्यथा ती स्वच्छ धुवून कच्चीही खाऊ शकता. फळं खाल्लायने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
ग्रीन टी – ग्रीन टी मध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. ते शरीराचे फ्री- रेडिकल्सपासून होणारे नुकसान रोखतात व संरक्षण करतात. ग्रीन टी चे नियमित सेवन केल्यास आपले शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.