मधुमेह नियंत्रणात नसेल तर असतो हार्ट ॲटॅकचा धोका, अशी घ्या काळजी

टाईप-2 मधुमेह झालेल्या रुग्णांमध्ये हार्ट फेल झाल्याची प्रकरणे अधिक दिसून येतात, असे कार्डिओव्हॅस्क्युलर डायबेटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

मधुमेह नियंत्रणात नसेल तर असतो हार्ट ॲटॅकचा धोका, अशी घ्या काळजी
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 4:07 PM

नवी दिल्ली – संसर्गजन्य आजारांनंतर हृदय (heart) व रक्तवाहिन्यासंबंधी आजारामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू होतात. त्यापैकी हार्ट ॲटॅकच्या (heart attack) केसेसमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कोरोना महामारीपासून हार्ट ॲटॅक आणि कार्डिॲक अरेस्टमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे. अनेक लोक लहान वयातच हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमावत आहेत. हृदयविकाराचे एक प्रमुख कारण म्हणजे मधुमेहासारखी (diabetes) समस्याही आहे, त्यावर वेळीच नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, खराब जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 2021 साली जगभरात 18 ते 80 वयोगटातील 54 कोटी लोकांना मधुमेह आहे. आता कमी वयात मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. या आजारामुळे थेट हृदयरोगाचा धोका वाढतो.

मधुमेहामुळे कोरोनरी आर्टरीचे होते नुकसान – द लॅन्सेट या मेडिकल जर्नलमध्ये 2016 साली प्रकाशित झालेल्या अभ्यासामध्ये असे नमूद करण्यात आल आहे की, ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांना हृदयरोगाचा धोका 20 टक्के जास्त असतो. रक्तातील साखर वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, व हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो. ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढतो. दरवर्षी अशी काही प्रकरणे समोर येत आहेत ज्यामध्ये मधुमेहामुळे कोरोनरी आर्टरी आणि पेरिफेरल आर्टरीचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांना हृदयरोगापासून बचाव करण्याचा सल्ला दिला जातो.

हे सुद्धा वाचा

टाइप-2 मधुमेह असलेल्या व्यक्तींना अधिक धोका – टाईप-2 मधुमेह झालेल्या रुग्णांमध्ये हार्ट फेल झाल्याची प्रकरणे अधिक दिसून येतात, असे कार्डिओव्हॅस्क्युलर डायबेटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. ज्या रुग्णांना दीर्घकाळापासून मधुमेह आहे, त्यांच्यामध्ये हार्ट फेल होण्याचा धोका ३० ते ४० टक्के असतो. अशा रुग्णांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.

मधुमेहाच्या रुग्णांनी या गोष्टींची घ्यावी काळजी – मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची काळजी घेण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे डॉक्टरांचे म्हणणं आहे. आहारात फॅटयुक्त पदार्थ, पॅकबंद पदार्थ आणि गोड अजिबात खाऊ नये. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासत रहावी. झोपण्याची आणि उठण्याची एक नियमित वेळ निश्चित करावी. रोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. दर तीन महिन्यांनी हृदय तपासणी करून घ्यावी. यासाठी लिपिड प्रोफाइल टेस्ट आणि ट्रेडमिल टेस्टही करता येते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.