Health | मधुमेहग्रस्त रुग्णांनी ‘या’ 3 प्रकारे करा दुधाचे सेवन, नियंत्रणात राहतील अनेक आजार!

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मधुमेह ग्रस्त रुग्णांना त्यांच्या खाण्यापिण्याची, आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. या रोगात, अधिकाधिक अशा गोष्टींचे सेवन करणे आवश्यक आहे, जेणेकरुन रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहील.

Health | मधुमेहग्रस्त रुग्णांनी ‘या’ 3 प्रकारे करा दुधाचे सेवन, नियंत्रणात राहतील अनेक आजार!
मधुमेह
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 11:17 AM

मुंबई : जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मधुमेह ग्रस्त रुग्णांना त्यांच्या खाण्यापिण्याची, आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. या रोगात, अधिकाधिक अशा गोष्टींचे सेवन करणे आवश्यक आहे, जेणेकरुन रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहील. अशा परिस्थितीत, दूध आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. सकाळी दूध प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते (Diabetes patients should drink milk with these ingredients).

जेव्हा मधुमेहाची सुरुवात होते तेव्हा…

आरोग्य तज्ज्ञांना असे वाटते की, जेव्हा आपले शरीर पॅनक्रियाज (स्वादुपिंड) मधुमेहावरील रामबाण उपाय असणारे इन्सुलिन उत्पादन थांबवते किंवा कमी करते, तेव्हा आपल्या रक्तात ग्लूकोजची पातळी कमी होते. जर, या पातळीवर नियंत्रण ठेवले नाही, तर आपण मधुमेहाचे रुग्ण बनू शकता.

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अबरार मुलतानी यांच्या मते, नाश्त्यात दूध सेवन केल्यास टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांना खूप फायदा होतो. दुधाचे सेवन केल्याने कर्बोदकांचे पचन आणि रक्तातील साखर कमी होते.

मधुमेहग्रस्त रूग्णांनी अशा प्रकारे करावे दुधाचे सेवन

दालचिनीयुक्त दूध

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अबरार मुलतानी म्हणतात की, दालचिनी युक्त दूध मधुमेहग्रस्त रूग्णांसाठी फायदेशीर आहे, कारण दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करते. यात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे मधुमेह नियंत्रित करण्यात मदत करतात. दूध आणि दालचिनीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. यासह, यात बीटा कॅरोटीन, अल्फा कॅरोटीन, लायकोपीन आणि ल्युटीन देखील आहेत. या मिश्रणातील अँटिऑक्सिडेंट्स जे रक्तातील साखर कमी करण्यास उपयुक्त ठरतात आणि त्याद्वारे संक्रमणाचा धोका कमी करतात (Diabetes patients should drink milk with these ingredients).

बदाम दूध

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अबरार मुलतानी यांच्या मते, जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल, तर बदामाचे दूध आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बदामाचे दूध बाजारात सहज उपलब्ध होते आणि आपण ते घरी देखील बनवू शकता. बदामाच्या दुधात कॅलरी कमी असतात आणि त्यात व्हिटामिन डी, ई आणि आवश्यक पोषक घटक असतात. त्यात प्रथिने आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात आढळतात, जे रक्तामध्ये ग्लुकोज जलदपणे शोषू देत नाही.

हळद दूध

डॉक्टरांच्या मते, हळद दूध मधुमेह रुग्णासाठी फायदेशीर ठरतो. हळदीमध्ये कर्क्युमिन असते, मधुमेहाच्या रुग्णांसाठी याचा मर्यादित वापर चांगला ठरतो.

(टीप : कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Diabetes patients should drink milk with these ingredients)

हेही वाचा :

दाढी मोठी असेल तर कोरोनाचा धोका अधिक?, पाहा डॉक्टरांचं म्हणणं काय…

वाढलेले वजन कमी करण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स फाॅलो करा आणि वजन कमी करा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.