Diabetes | मधुमेहाच्या रूग्णांनी पायाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी या खास टिप्स फाॅलो कराव्यात!
मधुमेहाच्या रूग्णांनी घरी परतल्यावर पाय धुवायला हवेत. रात्री झोपण्यापूर्वी पाय थोडावेळ कोमट पाण्यात भिजवणे, सौम्य साबणाने पाय धुणे आणि मऊ-आरामदायी शूज घालणे देखील महत्त्वाचे आहे. आठवड्यातून एकदा पायांची मालिश करा. आपले पाय धूळ आणि वाळूपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. दर दोन महिन्यांनी साखर चेक करायला हवी.
मुंबई : मधुमेहाची (Diabetes) समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. मधुमेहामुळे हृदय, मूत्रपिंड आणि शरीराचे मोठे नुकसान होते. मधुमेहींनी त्यांच्या पायाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कॅन्सरपेक्षाही (Cancer) मधुमेहाचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. मधुमेहाच्या रूग्णांना व्यायाम, आहार आणि त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. मधुमेहामुळे पाय दुखणे, सूज येणे, चालता न येणे या समस्या निर्माण होतात. तसेच तुम्हाला मधुमेह असल्यास पायांच्या विविध समस्या आणि जखमांची समस्या होते. यामुळे मधुमेह असलेल्या रूग्णांनी पायाला थोडी जरी दुखापत झाली तरी डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण आपण याकडे दुर्लक्ष (Ignore) केले तर पायांचा समस्या वाढू शकतात.
शस्रक्रिया टाळण्यासाठी याप्रकारे काळजी घ्या
मधुमेहाच्या रूग्णांनी घरी परतल्यावर पाय धुवायला हवेत. रात्री झोपण्यापूर्वी पाय थोडावेळ कोमट पाण्यात भिजवणे, सौम्य साबणाने पाय धुणे आणि मऊ-आरामदायी शूज घालणे देखील महत्त्वाचे आहे. आठवड्यातून एकदा पायांची मालिश करा. आपले पाय धूळ आणि वाळूपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. दर दोन महिन्यांनी साखर चेक करायला हवी. शूजमुळे पाय ताठ होतात. त्वचा जाड होते. मधुमेहींना यामुळे अल्सर होण्याचीही शक्यता असते. काही वेळा संसर्ग अधिक पसरल्यास पाय खराब होण्याची देखील शक्यता असते.
साखरेची पातळी व्यवस्थित राहिल मदत होईल
सकाळी आॅफिसला जाण्याच्या गडबडीमध्ये आपण बऱ्याच वेळा नाश्ता न करता निघतो. मात्र, ज्यांना मधुमेह आहे, अशांनी काहीही झाले तरी नाश्ता करणे टाळू नये. मधुमेहींसाठी सकाळचा नाश्ता अत्यंत महत्वाचा ठरतो. तसेच दुपारचे जेवणही वेळेवरच करा. साखरेची पातळी व्यवस्थित राहिल अश्याच पदार्थांचा दुपारच्या सेवनात समावेश करा. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ खाणे 100 टक्के टाळाच. मधुमेहींनी आपल्या दुपारच्या सेवनामध्ये शक्यतो भाकरीचाच समावेश करावा. मधुमेहाच्या रूग्णांनी भात खाण्यापेक्षा क्विनोआचा आपल्या आहारात समावेश करावा. कारण भातामध्ये साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते.