Diabetes | मधुमेही रुग्णांनी या टिप्स फाॅलो करून वर्षभर साखर नियंत्रणात ठेवावी!
ही सर्व पेये शरीराला हायड्रेट ठेवतात. यातून शरीराला आवश्यक पोषकतत्वेही मिळतात. शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमची पातळी राखण्यात या नारळाच्या पाण्याची भूमिका असते. तसेच लिंबू आणि काकडीचे काप एक लिटर पाण्यात टाकून खा. सब्जा बियांमध्ये भरपूर फायबर असते. सब्जा रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करतात.
मुंबई : मधुमेहाच्या (Diabetes) रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैली अत्यंत महत्वाची आहे. जेव्हा आपण कोणतेही अन्न खातो तेव्हा आपल्या स्वादुपिंडातून इन्सुलिन स्राव होतो. खाल्लेल्या अन्नातील अतिरिक्त ग्लुकोजचे (Glucose) प्रमाण कमी करणे हे इन्सुलिनचे कार्य आहे. जेव्हा इन्सुलिनचे उत्पादन कमी होते किंवा इन्सुलिन तयार होते. परंतु ते कार्य करू शकत नाही तेव्हा शरीरात अतिरिक्त ग्लुकोज राहते. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असणे ही मधुमेहाची समस्या आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांना जास्त पाणी (Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. याव्यतिरिक्त त्यांनी आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा.
डिहायड्रेशन आणि थकवा
रक्तातील साखर नियंत्रणात राहिली नाहीतर डिहायड्रेशन, थकवा, अशक्तपणा या समस्या निर्माण होतात. साखर वाढली की एक प्रकारची अस्थिरताही निर्माण होते. ताण जास्त असेल तर तिथून साखर वाढण्याची निर्माण होते. त्यामुळे मधुमेहींनी काही महत्वाच्या टिप्स नक्कीच फाॅलो करायला हव्यात.
काकडी आणि लिंबू
ही सर्व पेये शरीराला हायड्रेट ठेवतात. यातून शरीराला आवश्यक पोषकतत्वेही मिळतात. शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमची पातळी राखण्यात या नारळाच्या पाण्याची भूमिका असते. तसेच लिंबू आणि काकडीचे काप एक लिटर पाण्यात टाकून खा. सब्जा बियांमध्ये भरपूर फायबर असते. सब्जा रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करतात.
हिरव्या पालेभाज्या
मधुमेहींसाठी पालक, ब्रोकोली, मटार, शिमला मिरची, गाजर, टोमॅटो, बीट हे वर्षभर नियमानुसार खाणे आवश्यक आहे. हे शरीराला आवश्यक पोषक तत्वांची गरज देखील राखते. त्यामुळे यांचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आहे. रोजच्या आहारातून बटाटे आणि साखर पूर्णपणे काढून टाका. तुम्ही जितक्या हिरव्या भाज्या खाता तेवढे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.