Diabetes | मधुमेही रुग्णांनी उन्हाळ्यात या आरोग्यदायी पेयांचे नक्की सेवन करावे!
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आले आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आल्याचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करून आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकतो. उन्हाळ्याच्या हंगामात आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण एक ग्लास पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून त्यामध्ये आले किसून टाकावे.
मुंबई : उन्हाळ्याचा हंगाम म्हटंले की, डिहायड्रेशनची (Dehydration) समस्या आलीच. डिहायड्रेशन टाळण्यासाठी आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी हेल्दी ड्रिंक्सचे सेवन करणे खूप आवश्यक असते. तसेच या खास पेयांमुळे आपल्या शरीराला दिवसभराची ऊर्जा मिळण्यास देखील मदत होते. मात्र, या काही हेल्दी पेयांमध्ये (Healthy drinks) साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मधुमेहींसाठी आणि ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी धोकादायक ठरते. यासाठी साखर कमी असलेली पेय घ्यायला हवी. आपल्यापैकी अनेकांचे वजन उन्हाळ्याच्या हंगामात झपाट्याने वाढते. कारण जास्त साखर (Sugar) असलेल्या पेयांचे सेवन केले जाते. परिणामी वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. चला तर मग जाणून घेऊयात, अशा काही हेल्दी पेयांबद्दल ज्याचे सेवन करूनही आपले वजन वाढणार नाही.
आले
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आले आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आल्याचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करून आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकतो. उन्हाळ्याच्या हंगामात आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण एक ग्लास पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून त्यामध्ये आले किसून टाकावे. दहा मिनिटांनंतर हे खास पेय प्यावे. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल.
सत्तू
सत्तूचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. थंड पाण्यात सत्तू पावडर मिसळून त्यात लिंबाचा रस आणि मीठ टाकून ते मिसळून सेवन केले पाहिजे. यामुळे आपले शरीर थंड राहण्यास मदत होते. शियाव सत्तूमुळे आपल्या शरीराला ऊर्जा देखील मिळते. यामुळे सध्याच्या हंगामात आपण या खास पेयाचे नक्कीच सेवन करावे. सत्तूचे सेवन शक्यतो दुपारच्या वेळीच करणे फायदेशीर ठरते.
ताक
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये ताक असो किंवा लस्सी यांचे सेवन नेहमीच केले पाहिजे. कारण हे आपले शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. सध्याच्या हंगामामध्ये तर दुपारच्या सेवनामध्ये ताकाचा समावेश करायला हवा. उन्हाळ्यात लस्सीचे सेवन केले जाते, शरीराला थंडावा देते आणि खूप चवदार असते. शक्यतो ताक आणि लस्सी दोन्हीही घरी तयार केलेल्या दह्यापासूनच बनवा.