वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्ट मध्ये करा या आहाराचा समावेश!
असे म्हटले जाते की नाश्ता हा आपल्या दैनंदिन डाएट रुटीनचा एक महत्वाचा भाग आहे, पहिली गोष्ट म्हणजे नाश्ता कधीही टाळू नये कारण यामुळे मिळणारी ऊर्जा दिवसभर प्रभाव ठेवते. तसेच नाश्ता हेल्दी ठेवला नाही तर वजन कमी करणे हे फक्त स्वप्नच असेल.
वजन कमी करणे इतके सोपे नसते, अनेकदा कडक आहार आणि व्यायाम करूनही अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. आपण दिवसाच्या सुरुवातीलाच वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. असे म्हटले जाते की नाश्ता हा आपल्या दैनंदिन डाएट रुटीनचा एक महत्वाचा भाग आहे, पहिली गोष्ट म्हणजे नाश्ता कधीही टाळू नये कारण यामुळे मिळणारी ऊर्जा दिवसभर प्रभाव ठेवते. तसेच नाश्ता हेल्दी ठेवला नाही तर वजन कमी करणे हे फक्त स्वप्नच असेल.
- भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स म्हणाले की, ब्रेकफास्टमध्ये ओट्स खाणे हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे. या अन्नामध्ये व्हिटॅमिन ई, फॅटी ॲसिड आणि फायबर सारखे महत्वाचे पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया ओट्स खाण्याचे फायदे.
- वाढते वजन आणि टाइप 2 मधुमेह यासारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी नाश्त्यात ओट्स खाणे आवश्यक आहे, हे वजन कमी करण्याचे आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे काम करते.
- वजन कमी करण्यासाठी एक प्रमुख अट म्हणजे आपली पचनसंस्था चांगली असणे. ओट्समध्ये आढळणारे फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही रोज ब्रेकफास्टमध्ये ओट्स खाण्यास सुरुवात केली तर बद्धकोष्ठतेसारखी समस्या उद्भवणार नाही.
- ओट्समध्ये मेलाटोनिन आणि जटिल कार्ब असतात हे खाल्ल्याने स्लीप डिसऑर्डरची समस्या दूर होईल. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तरुण व्यक्तीने किमान 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीराचे वजनही टिकून राहते.
- हृदयरोगांपासून बचाव, ओट्स खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, कारण यात आढळणारे डायटरी फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करते. अशावेळी हार्ट अटॅक, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल व्हेसल डिसीजचा धोका कमी होतो.
- तुम्हाला हे माहित नसेल, पण ओट्स खाल्ल्याने तुमच्या त्वचेवर खूप परिणाम होतो. यामुळे त्वचेची जळजळ, खाज सुटणे, कोरडेपणा आणि चिडचिड कमी होते. त्याला ‘नॅचरल एक्सफोलिएटर’ म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Non Stop LIVE Update