डोकेदुखी आणि मायग्रेन यामध्ये नेमका काय असतो फरक? थंडीच्या दिवसात तुम्हाला सुद्धा डोकेदुखी त्रास देत असेल तर “हे” आहे त्यामागील कारण!!

साधारणपणे नेहमी होणारी दोकेदुखी आणि मायग्रेन या दोघांमध्ये फरक असतो परंतु अनेकजण या मधील फरक समजून घेत नाहीत म्हणूनच आजच्या लेखामध्ये डोकेदुखी आणि मायग्रेन या दोघांमध्ये नेमका काय फरक असतो?, याची लक्षणे काय असतात ,यामागे काही शास्त्रीय कारण आहे का ?,या सर्वांबद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

डोकेदुखी आणि मायग्रेन यामध्ये नेमका काय असतो फरक? थंडीच्या दिवसात तुम्हाला सुद्धा डोकेदुखी त्रास देत असेल तर हे आहे त्यामागील कारण!!
डोकेदुखी
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 6:53 PM

सर्वसाधारणपणे डोकेदुखी होणे ही सर्वसामान्य समस्या मानली जाते. यामागील कारणे सुद्धा हलकीफुलकी असतात जसे की ,आपली झोप पूर्ण न होणे, शरीराची दग दग होणे ,डोळ्यांवर ताण येणे, विशेष करून तरुण मंडळींमध्ये ही समस्या आपल्याला जास्त प्रमाणात घडताना पाहायला मिळते. सर्वसामान्य असणारी डोकेदुखी आणि मायग्रेन या दोघांमध्ये फरक असतो परंतु आपल्यापैकी अनेक जण यातील फरक ओळखत नाही आणि इथेच त्यांचा गोंधळ उडतो. या दोघांमध्ये खूप तफावत आहे.जेव्हा आपल्याला सर्वसाधारणप्रमाणे डोकेदुखी होते तेव्हा जास्त त्रास जाणवत नाही परंतु जेव्हा आपल्याला मायग्रेनचा त्रास असतो, तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये डोकेदुखी उद्भवते. जर तुम्हाला सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये वेदना देणारी डोकेदुखी त्रास देत असेल तर आणि अशावेळी तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर भविष्यात तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता आहे. कोणतीही समस्या गंभीर होण्याआधीच त्या समस्येबद्दल जाणून घेणे अत्यंत गरजेचे ठरते, म्हणूनच आज आपण यातील फरक जाणार आहोत. जेणेकरून या समस्येवर आपल्याला त्वरित उपचार करता येईल.

डोकेदुखी आणि मायग्रेन यांच्यामध्ये हा असतो फरक

लक्षणांच्या आधारावर त्यांना कसे ओळखावे आणि थंडीमध्ये होणारी डोकेदुखी ती बरी कशी करावी हे त्यामागील कारण..डोकेदुखी आणि मायग्रेन यांच्यातील फरक अशा प्रकारे समजू शकतो.

हेल्‍थलाइनचा रिपोर्ट असे म्हणतो की, डोक्यात वेदना झाल्यावर डोक्यामध्ये एका विशिष्ट प्रकारचा दबाव आपल्याला जाणवू लागतो. अनेक प्रकरणांमध्ये ही वेदना डोक्याच्या दोन्ही बाजूंना घडते, क्वचित काही प्रकरणांमध्ये डोक्याच्या एका बाजूला डोकेदुखी दरम्यान वेदना होतात जसे की कपाळ, मानेच्या मागे दुखणे इत्यादी..सर्वसाधारणप्रमाणे वाटणारी डोकेदुखी अंदाजे 30 मिनिटापर्यंत राहते त्यानंतर आपली डोकेदुखी थांबून जाते.

मेयोक्‍लीनिक ( Mayo Clinic) च्या रिपोर्टनुसार साधारण डोकेदुखी होण्यामागील कारण आपल्या जीवनातील अधिक ताणतणाव, टेन्शन असतात तसेच आपल्या शरीरातील ज्या काही मांसपेशी,स्नायू असतात त्या मांस पेशी कार्यामध्ये जर कोणताही अडथळा निर्माण झाला तर अशावेळी शरीरामध्ये बैचेनी निर्माण होते आणि यावेळी आपले डोके दुखू लागते.

जेव्हा आपण मायग्रेन बद्दल जाणून घेतो तेव्हा ही डोकेदुखी सर्वसाधारण डोकेदुखी पेक्षा अधिक गंभीर वेदना देणारी असते, अशा परिस्थितीमध्ये डोकेदुखी शिवाय आपल्या शरीरामध्ये इतर अनेक लक्षणे सुद्धा जाणवू लागतात. जे रुग्णाला उद्भवणारी डोकेदुखी सर्वसाधारण असणारी डोकेदुखी नाही हे आपल्याला दर्शवित असते.

या लक्षणावरूनच तज्ञ डॉक्टर मंडळी आपल्याला सांगतात की तुम्हाला मायग्रेनचा त्रास आहे. मायग्रेन जेव्हा आपल्याला असतो तेव्हा काही लक्षणे सुद्धा आपल्याला वारंवार जाणवत असतात, ती लक्षणे म्हणजे वारंवार उलटी होणे, बैचेनी जाणवणे, एका डोळ्याच्या पापणीमागे किंवा काना जवळचा भाग वारंवार दुखणे. जर आपल्या डोळ्यावर जास्त प्रकाश आला किंवा जास्त गोंधळ ऐकू आला तर अशा वेळी चिडचिड होणे,काही वेळासाठी अंधुक दिसणे अशा विविध प्रकारची लक्षणे या सारख्या गंभीर आजारामध्ये जाणवू लागतात.

मायग्रेन होण्यामागे काय कारण असते ,आतापर्यंत हे समजू शकले नाही. जर काही तासाच्या आत तुमची डोकेदुखी थांबली नाही तर अशावेळी डॉक्टरांना अवश्य भेटायला हवे व त्यांनी दिलेल्या सल्याचा उपयोग करून घ्यायला हवा.

थंडीत का वाढते डोकेदुखीची समस्या..?

हिवाळ्याच्या दिवसात वातावरणामध्ये संपूर्ण थंडावा पसरलेला असतो आणि अशा वेळीच डोकेदुखीची समस्या सुद्धा जोर धरू लागते, यावर अमेरिकन मायग्रेन फाउंडेशन यांनी एक रिपोर्ट बनवला आहे आणि या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, हिवाळ्यामध्ये थंडी आणि रुक्ष असलेली हवा शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण करून डोकेदुखीचे कारण बनते. विशेष करून जेव्हा तुम्ही तुमच्या घरात गरमी मिळवण्यासाठी काही वस्तूंचा उपयोग करतात. आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने आपले शरीर कुठेतरी आतून गोठून जाते आणि परिणाम म्हणून मनुष्याला डोके दुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागते म्हणूनच थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात पाणी असणे गरजेचे आहे म्हणून दिवसभरातून आठ ते दहा ग्लास नियमितपणे पाणी प्यायला हवे.

धक्कादायक! इचलकरंजीत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 61 वर्षीय नराधमावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा

Omicron : ओमिक्रॉनची धास्ती! ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या- एकनाथ शिंदे

Goa Assembly Election 2022 : बिगुल वाजलं! गोव्यात आचारसंहिता लागू, ‘व्हॅलेन्टाईन डे’ला मतदान, निकाल कधी?

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.