रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे तोटे!
तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायली तर असं करणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. यामुळे तुम्हाला उच्च रक्तातील साखर, ताण तणाव अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते बघुयात...
मुंबई: कॉफी आणि चहाची आवड असणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. तर काही लोक मूड रिफ्रेश करण्यासाठी कॉफीचे ही सेवन करतात. पण तुम्हाला माहित आहे का की जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायली तर असं करणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. यामुळे तुम्हाला उच्च रक्तातील साखर, ताण तणाव अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते बघुयात…
रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे तोटे
रक्तातील साखरेची उच्च पातळी
कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपल्या रक्तातील साखरेवर परिणाम करते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. अशावेळी जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर सकाळी रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन करायला विसरू नका.
स्ट्रेस आणि मूड स्विंग
सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढू शकते. यामुळे महिलांमध्ये ओव्हुलेशन आणि हार्मोनलवर परिणाम होतो. ज्यामुळे तणावाचे प्रमाणही वाढू शकते. अशा वेळी तुम्हाला चिडचिड वाटू शकते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळावे.
डिहायड्रेशन
सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने डिहायड्रेशन होते. कारण रिकाम्या पोटी कॅफिनचे सेवन केल्याने वारंवार लघवी होते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी किंवा लिंबू मधाचे पाणी आरोग्यासाठी चांगले असते. याचे सेवन केल्याने शरीरात असलेले टॉक्सिन्स बाहेर पडतात.
पचनसंस्था बिघडू शकते
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने पचनसंस्था बिघडू शकते. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कारण कॉफी पोटातील आम्लाच्या उत्पादनास उत्तेजन देऊ शकते. ज्यामुळे पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)