वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिता? मग वाचा सतत गरम पाणी पिण्याचे तोटे!
काही लोक हे सगळं इतकं निष्काळजीपणे करतात. जास्त गरम पाणी पिण्यास सुरवात करतात आणि थांबतच नाही. असे केल्याने आपल्या आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते, चला तर मग जाणून घेऊया आपण जास्त गरम पाणी का पिऊ नये.
मुंबई: जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांना अनेकदा हलके गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, हिवाळ्यात कोमट पाणी पिणे अनेकांसाठी सक्तीचे बनते कारण यामुळे घसा शिथिल होतो आणि शरीराला उष्णता मिळते, परंतु काही लोक हे सगळं इतकं निष्काळजीपणे करतात. जास्त गरम पाणी पिण्यास सुरवात करतात आणि थांबतच नाही. असे केल्याने आपल्या आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते, चला तर मग जाणून घेऊया आपण जास्त गरम पाणी का पिऊ नये.
जास्त गरम पाणी पिण्याचे तोटे
- रात्री झोपतानाही गरम पाणी पिऊ नका कारण यामुळे निवांत झोप घेण्यात अडचणी येऊ शकतात कारण तुम्हाला रात्री अनेकवेळा टॉयलेटमध्ये जावे लागू शकते. गरम पाण्यामुळे रक्तवाहिन्यांच्या पेशींवरही ताण पडतो.
- आपल्या शरीरात मूत्रपिंड फिल्टर म्हणून कार्य करते, जे शरीरातून अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते कारण मूत्रपिंडात एक विशेष प्रणाली असते. जास्त गरम पाणी प्यायल्यास किडनीच्या कार्यावर वाईट परिणाम होतो.
- जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायले तर समजून घ्या की तुम्ही तुमच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांचे खूप नुकसान करत आहात. जास्त गरम पाण्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. शरीराच्या अंतर्गत ऊती संवेदनशील असतात, ज्यामुळे फोड येऊ शकतात.
- दिवसभर गरम पाण्याचे सेवन केल्यास मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये सूज येण्याचा धोका असतो, यामुळे तुम्हाला डोकेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे असे करणे टाळा.
- गरम पाण्यामुळे आपल्या रक्ताच्या प्रमाणात देखील परिणाम होतो. यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे आपण उच्च रक्तदाबाचे शिकार होऊ शकता, जे नंतर हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनू शकते.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)