बेकिंग सोडा किती खावा? जास्त बेकिंग सोडा खाण्याचे तोटे!
काही लोकांना सोडा पाणी पिणे देखील आवडते. जर मर्यादित प्रमाणात बेकिंग सोडा खाल्ला तर तो इतका वाईट नाही, परंतु जास्त प्रमाणात खाणे हानिकारक ठरू शकते.
बेकिंग सोडा हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे कारण तो अनेक प्रकारच्या केक, ब्रेड, बेकरी उत्पादनांमध्ये असतो. काही लोकांना सोडा पाणी पिणे देखील आवडते. जर मर्यादित प्रमाणात बेकिंग सोडा खाल्ला तर तो इतका वाईट नाही, परंतु जास्त प्रमाणात खाणे हानिकारक ठरू शकते. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितले की, बेकिंग सोड्याचे जास्त सेवन केल्याने आपल्या शरीरावर कसा वाईट परिणाम होतो.
जास्त बेकिंग सोडा खाण्याचे तोटे
- जास्त प्रमाणात बेकिंग सोडा खाल्ल्यामुळे तुमच्या पोटात गॅस निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे पोट फुगणे किंवा सूज येते. जेव्हा आपण सोडा खातो तेव्हा तो रासायनिक प्रक्रियेअंतर्गत तो आम्लांमध्ये मिसळतो. त्यामुळे बेकिंग सोड्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
- बेकिंग सोड्यामध्ये भरपूर प्रमाणात सोडियम असते, जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. या पदार्थामुळे आपल्या हृदयाच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्याच्या ओव्हरडोजमुळे हृदयविकाराचा झटका किंवा हृदय निकामी होऊ शकते. कार्डिएक अरेस्टची अनेक प्रकरणे अशा लोकांमध्ये येतात जे जास्त बेकिंग सोडा खातात. त्यामुळे त्यांचे सेवन कमी करणे अत्यंत गरजेचे आहे.
बेकिंग सोडा किती खावा?
जर तुमची पचनक्रिया खराब असेल तर अर्धा कप पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळून प्या, आठवड्यातून फक्त 2 वेळा त्याचे सेवन करा, त्यापेक्षा जास्त वेळा बेकिंग सोडा खाऊ नये.