त्वचेला ‘फंगल’पासून वाचवण्यासाठी ‘या’ पाच चुका टाळाच

शरीराला खाज सुटते, त्वचेची जळजळ तसेच आग होते. अनेकदा चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे याचे दुष्परिणाम त्वचेवर दिसून येत असतात. शक्यतो त्वचेच्या समस्या सुटण्यास बराच वेळ लागत असतो, अशा वेळी डॉक्टरांकडील उपचारांसोबत आपल्या काही सवयीदेखील बदलने आवश्‍यक असते.

त्वचेला ‘फंगल’पासून वाचवण्यासाठी ‘या’ पाच चुका टाळाच
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 12:34 PM

उन्हाळ्याला (summer) सुरुवात झाली आहे. राज्यभरात उन्हाचा पारा चढत आहे. अशातच वाढत्या उन्हासोबत शरीराची काळजी घेणे आवश्‍यक असते. अनेकदा उन्हामुळे त्वचेच्या विविध समस्या निर्माण होत असतात. उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्याने साहजिकच वेळोवेळी शरीराची स्वच्छता करणे आवश्‍यक ठरते. घाम त्वचेत मुरल्यास त्यातून त्वचेशी संबंधित विविध आजार निर्माण होत असतात. त्वचेवरील फंगल इन्फेक्शन (skin fungal) ही आजकाल मोठी समस्या आहे. त्वचेवर फंगल होण्याची तशी अनेक कारणे आहेत, परंतु पावसाळा (Rainy season) व उन्हाळ्यात आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे अनेकदा या दिवसांमध्ये फंगल आपले डोके वर काढत असते. त्यामुळे शारीरिक स्वच्छता व योग्य सवयी लावणे अतिशय महत्वाचे आहे. फंगल होण्यामागील प्रमुख कारणांचा आढावा घेणार आहोत.

1)  साखरेचा जास्त वापर

त्वचेवर फंगल होत असताना, डॉक्टर साखर कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला देत असतात. त्याऐवजी फायबरयुक्त पदार्थ जास्त खावीत.

2) दारू

ज्या लोकांना दारू पिण्याची सवय असते, त्यांनाही फंगल होण्याचा धोका निर्माण झालेला असतो. शक्यतो दारु सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते, शिवाय फंगलची समस्याही निर्माण होत असते. तज्ज्ञांच्या मते, फंगल इन्फेक्शनच्या वेळी अल्कोहोलयुक्त गोष्टी सोडल्या नाहीत तर संसर्ग आणखी वाढू शकतो.

3) घामाचे कपडे

अनेकदा घामाचे कपडे घातल्याने त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग वाढतो. फंगलची लागण झाल्यास दिवसातून दोनदा कपडे बदलावे, तसेच वेळोवेळी शारीरिक स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे.

4) स्टिरॉइड क्रीम

फंगलदरम्यान त्वचेशी संबंधित कृत्रिम उत्पादनांची काळजीपूर्वक निवड केली पाहिजे. काहीवेळा स्टिरॉइड्स क्रीममुळे त्वचेवरील संसर्ग आणखी वाढू शकतो. अशा क्रीममुळे काही काळ खाज कमी होत असली तरी, संसर्ग वाढण्याचा धोका कायम असतो.

5)  घट्ट कपडे घालणे टाळा

त्वचेवर फंगल होत असताना, लोक असे कपडे किंवा बूट घालतात, ज्यामुळे संसर्ग आणखी वाढतो. वास्तविक, घट्ट कपडे वा बूट घातल्याने फंगलचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या

लहान वयातच मुलांच्या दातांना कीड का लागते बरं? जाणून घ्या कारण आणि उपाय

तुम्ही कमी पाणी पिता का?, सावधान! तुम्हाला होऊ शकतात गंभीर आजार

चीन आणि ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोनाच्या रुग्णात वाढ, पुन्हा येतेय चौथी लाट?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.