झोपण्यापूर्वी हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, शरीराला होईल मोठे नुकसान…

आपण झोपण्यापूर्वी काय खातोय, हेदेखील आपल्या झोपेवर परिणाम करीत असते. असे अनेक पदार्थ आहेत, ज्याचे रात्रीच्या वेळी सेवन टाळाले पाहिजे.

झोपण्यापूर्वी हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, शरीराला होईल मोठे नुकसान...
चांगली झोप येण्यासाठी काय खावं आणि काय खाऊ नये?
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 6:47 PM

चांगल्या आरोग्यासाठी सकस आहार (healthy diet), व्यायाम व झोप ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची असते. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने आहार व पुरेसा व्यायाम महत्वाचा आहे, त्याच प्रमाणे पुरेशी झोपदेखील महत्वाची आहे. मानसिक थकवा दूर करण्यासाठी दिवसाला किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. परंतु अनेक जणांना शांत झोप (Restful sleep) लागत नसल्याची समस्या असते. यामागे अनेक घटक कारणीभूत असतात. पुरेसे श्रम न करणे, मानसिक ताण, (Mental stress) कामाचे स्वरूप आदी विविध कारणांमुळे याचा परिणाम आपल्या झोपेवर होत असतो. परंतु त्यासोबतच आपण झोपण्यापूर्वी काय खातोय, हेदेखील आपल्या झोपेवर परिणाम करीत असते. असे अनेक पदार्थ आहेत, ज्याचे रात्रीच्या वेळी सेवन टाळाले पाहिजे. याचा थेट परिणाम आपल्या रात्रीच्या झोपेवर होत असतो. झोपेवर परिणाम करणाऱ्या अशाच काही पदार्थांचा आढावा घेणार आहोत.

कॉफीचे सेवन

अनेक जण थकवा किंवा मरगळ झटकण्यासाठी शरीराला नवचेतना मिळवण्यासाठी कॉफीचे सेवन करीत असतात. परंतु तात्पुरता कॉफीमुळे उत्साह निर्माण होत असला तरी, तिच्या सेवनामुळे निद्रानाश होण्याचा धोका निर्माण होत असतो. अनेक जण रात्रीचे काम करण्यासाठी झोप न लागावी म्हणून वारंवार कॉफीचे सेवन करतात. परंतु हीच सवय हळूहळू तुमची झोप कायमची खराब करीत असते.

टोमॅटो

टोमॅटोमुळे ‘ॲसिड रिफ्लक्स’ होऊ शकतो व यातून पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात, याचा थेट परिणाम आपल्या झोपेवर पडत असतो. ‘द सन’च्या रिपोर्टनुसार, टोमॅटोमुळे अस्वस्थता वाढू शकते यातून तुमची झोप प्रभावित होऊ शकते.

कांदा

कांदा हा एक असा पदार्थ आहे, जो तुमच्या पचनसंस्थेला त्रासदायक ठरू शकतो. ‘द स्लीपिंग असोसिएशन’ च्या रिपोर्टनुसार कांदा पोटात गॅस निर्माण करण्याचे काम करतो. त्यामुळे तुमच्या पोट खराब होऊन त्यामुळे अॅसिडीटीची समस्या निर्माण होऊ शकतो. छातीत जळजळ होत असल्याने झोपेला व्यत्यय येतो. कच्चे किंवा शिजवलेले दोन्ही प्रकारचे कांदे अशा समस्या निर्माण करू शकतात.

चॉकलेटचे दुष्परिणाम

चॉकलेट जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास यातून रक्तदाब आणि हृदयाची धडधड वाढणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. रक्तदाब वाढल्यास जीव घाबरणे, छातीत धडधड होणे आदी समस्या जाणवतात. अशाने त्याचा झोपेवर परिणाम होत असतो. चॉकलेटमध्ये साखर, थियोब्रोमाइन आणि फेनाइलेथेलामाइन यांसारखे उत्तेजक पदार्थसुद्धा असतात हे शरीराला घातक असतात.

संबंधित बातम्या :

‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे तुमचे डोळे राहतील निरोगी, दृष्टी देखील सुधारेल

आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास होईल मदत

हो खरयं… आता वेळ आलीयं ‘मास्क फ्री’ जगण्याची… काय आहे नेमका दावा…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.