Thyroid आहे? ‘हे’ पदार्थ चुकूनही खाऊ नका!
जेव्हा थायरॉईडची समस्या उद्भवते तेव्हा स्नायूंमध्ये खूप वेदना होतात. यामुळे सांधेदुखी, कोरडी त्वचा, लठ्ठपणा अशा समस्या जाणवू लागतात. असे काही पदार्थ आहेत ज्याचं सेवन केल्याने समस्या वाढू शकते. त्यामुळे जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही काही गोष्टींचे सेवन करणे टाळावे.
मुंबई: थायरॉईड ही आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची ग्रंथी आहे, ज्यातून थायरॉक्सिन संप्रेरक बाहेर पडतो. हा संप्रेरक इतका महत्वाचा आहे की तो कमी असेल किंवा जास्त दोन्ही बाबतीत आजार होऊ शकतात. होय, दोन्ही परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीला त्रासाचा सामना करावा लागू शकतो. जेव्हा थायरॉईडची समस्या उद्भवते तेव्हा स्नायूंमध्ये खूप वेदना होतात. यामुळे सांधेदुखी, कोरडी त्वचा, लठ्ठपणा अशा समस्या जाणवू लागतात. असे काही पदार्थ आहेत ज्याचं सेवन केल्याने समस्या वाढू शकते. त्यामुळे जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही काही गोष्टींचे सेवन करणे टाळावे.
थायरॉईडच्या रुग्णांनी ‘या’ गोष्टींचे सेवन करू नये
फायबरयुक्त भाज्या: जास्त फायबर असलेल्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जातात, परंतु तुम्हाला माहित आहे का की थायरॉईडच्या रुग्णांनी फायबरयुक्त भाज्यांचे सेवन करू नये. त्यांचे सेवन केल्याने तुमची समस्या वाढू शकते, तर पोटाशी संबंधित समस्यादेखील होऊ शकतात. त्यामुळे सोयाबीन, तंतुमय भाज्यांचे सेवन टाळावे.
सोया: जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही सोया प्रॉडक्ट्सचं सेवन अजिबात करू नका. कारण याचे सेवन केल्याने थायरॉईडची समस्या वाढू शकते.
ग्लूटेन प्रोटीन: थायरॉईडच्या रुग्णांनी ग्लूटेन प्रोटीन असलेल्या गोष्टींचे सेवन करू नये, ग्लूटेन हे थायरॉईडच्या औषधाला निकामी करते. ज्यामुळे समस्या वाढू शकते. त्यामुळे ब्रेड, बर्गर, केक, कँडी यांसारखे ग्लूटेनयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
प्रोसेस्ड फूड: थायरॉईडच्या समस्येमध्ये प्रोसेस्ड फूडचे सेवन करू नये. याचे सेवन केल्याने तुमची समस्या वाढू शकते.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)