ही फळे चुकूनही सोलून खाऊ नका!
घरातील वडीलधारी माणसं सुद्धा "रोज एक फळ खा" असा सल्ला आवर्जून देतात. आपणही त्याप्रमाणे त्याचा आहारात समावेश करतो. आता फळांची सालं काढायचं एक फॅड आलंय. मोठमोठ्या हॉटेलात गेलं की आपल्याला फळं अशी मस्त कट करून त्याची सालं काढून सर्व्ह केली जातात.
मुंबई: फळे आरोग्यासाठी चांगली हे काही वेगळं सांगायची गरज नाही. लहानपणापासून आपण हे ऐकत आलोय, घरातील वडीलधारी माणसं सुद्धा “रोज एक फळ खा” असा सल्ला आवर्जून देतात. आपणही त्याप्रमाणे त्याचा आहारात समावेश करतो. आता फळांची सालं काढायचं एक फॅड आलंय. मोठमोठ्या हॉटेलात गेलं की आपल्याला फळं अशी मस्त कट करून त्याची सालं काढून सर्व्ह केली जातात. पण फळांची सालं काढणं कितपत योग्य आहे? आपण असंही ऐकत आलोय की काही फळांची सालं आरोग्यासाठी चांगली असतात. मग अशी फळं कोणती? सालींमध्ये पोषक तत्त्व असणारी फळं नेमकी कोणती जाणून घेऊया…
ही फळे सोलून खाऊ नका
चिक्कू
चिक्कू सालीबरोबर खाल्ले जाते. त्याच्या सालीत व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, लोह आढळतात. त्यामुळे चिक्कू सालीबरोबर खाल्ले जाऊ शकते. आरोग्यासाठी ते उत्तम ठरेल.
किवी
किवीचे हे फळ त्याच्या सालीसकट खायला हवे. कारण किवीच्या सालीमध्ये फायबर, फोलेट, व्हिटॅमिन ई सारखे घटक आढळतात. आरोग्यासाठी हे घटक महत्त्वाचे आहेत.
पेर
पेरू सारखं दिसणारं पेर कधी खाल्लंय का? पेर खाताना नेहमी सालीसोबत खावं. जर तुम्ही सालींसोबत पेर खाल्ले तर शरीराला फायबर मिळेल. यात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, तंतू आणि खनिजे असतात. त्यामुळे पेर कधीही सोलून खाऊ नये. सर्दी किंवा खोकला झाल्यास त्याचे सेवन करू नये, हे लक्षात ठेवावे.
सफरचंद
सफरचंदाची साल अनेक जण खातात. सफरचंदाच्या सालीत अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, त्यामुळे सफरचंद धुवून थेट खावे, त्याची साल काढू नये.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)