शरीरात काही लक्षणं दिसताच करू नका दुर्लक्ष, वेळीच व्हा सावध, अन्यथा लिव्हर होऊ शकते खराब!

आपल्या शरीरातील लिव्हर हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. लिव्हरचे आरोग्य चांगले राहणे आपल्या शरीरासाठी उत्तम मानले जाते परंतु शरीरामध्ये अशी काही लक्षणे दिसताच आपल्याला सावधान बाळगायला हवी अन्यथा भविष्यात आपले लिव्हर खराब देखील होऊ शकते.

शरीरात काही लक्षणं दिसताच करू नका दुर्लक्ष, वेळीच व्हा सावध, अन्यथा लिव्हर होऊ शकते खराब!
liver healthImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 6:24 PM

मुंबईः आपले शरीर निरोगी राहण्यासाठी लिव्हर( liver) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो.आपल्या शरीरातील वेगवेगळ्या रसायनांना नियंत्रण ठेवण्यास सोबतच पित्ताची निर्मिती सुद्धा लिव्हरच्या माध्यमातूनच होत असते. आपल्या शरीरातील लिव्हर अन्नपदार्थ मधून जे काही पोषक तत्व असतात ते शोषून घेण्याचे कार्य करतो आणि विषारी घटक बाहेर काढण्यासाठी लिव्हर मदत करत असतो त्याच बरोबर लिव्हर आपल्या शरीरातील फॅट निर्मिती करण्याचे कार्य ( liver function) देखील करतो म्हणूनच बहुतेक वेळा आपल्या शरीरातील फॅट साठवण्याचे आणि मेटाबोलाइजेशनचे काम देखील लिव्हर करते. बहुतेक वेळा लिव्हरचे कार्य व्यवस्थित पार पडले नाही तर त्याचा विपरीत परिणाम कार्य गतीवर होतो. अशी काही लक्षणे (symptoms) दिसतात आपले लिव्हर भविष्यात खराब (damage) होऊ शकते. लिव्हर आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण अवयव असल्याने त्याची काळजी देखील घेणे अत्यंत गरजेचे आहे.

तज्ञ मंडळींच्या मते, लिव्हर दिवसाला 250 गॅलन रक्ताला फिल्टर करतो. अशातच जर लिव्हर योग्य पद्धतीने कार्य करत नसेल तर आपल्या शरीरात विषारी घटक वाढून जातात. लिव्हर मध्ये काही बिघाड झाल्यास आपल्या पचनसंस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे आपल्याला अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. जर एखादी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास आपले लिव्हर खराब सुद्धा होऊ शकते. अनेक घटनांमध्ये लिव्हर खराब होणे ही समस्या अनुवंशिक असते. बदललेली आहार पद्धती आणि जीवनशैली या सर्वांचा एकत्रित परिणाम सुद्धा लिव्हरच्या कार्यक्षमतेवर होत असतो.लिव्हर संबंधित अशी काही लक्षणे ही प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हवी अन्यथा भविष्यात आपल्याला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया काही लक्षण बद्दल…

पोटामध्ये वारंवार वेदना जाणवणे

क्लीवलैंड क्लिनिक यांच्या मते, ज्या व्यक्तींचे लिव्हर खराब झालेले असते किंवा खराब होण्याच्या मार्गावर असते, अशा व्यक्तींना पोट दुखीची समस्या वारंवार त्रास देऊ लागते. तसे पाहायला गेले तर पोट दुखी होण्यामागे वेगवेगळे कारण देखील असू शकतात. पोटाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या भागामध्ये वारंवार वेदना होणे हे लिव्हर खराब होण्याचे सूचक असते. जर या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष केले तर भविष्यात आपले लिव्हर खराब सुद्धा होऊ शकते. बहुतेक वेळा सिरोसिस कारणामुळे सुद्धा लिव्हर वाढल्यास किंवा लिव्हर ला सूज आल्यास लिव्हर बिघडण्याची शक्यता असते यामुळे सुद्धा अनेकदा पोटात वेदना होतात.

त्वचा पिवळी होते

त्वचा पिवळी होणे हे सर्वसाधारणपणे काविळीचे लक्षण मानले जाते. आपल्या सर्वांना माहितीच असेल की, जेव्हा आपल्या शरीरातील लिव्हर योग्य पद्धतीने कार्य करत नाही अशा वेळी व्यक्तीला काविळीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. रक्तामध्ये बिलीरुबिनची मात्रा वाढल्यामुळे अशी समस्या देखील होते. बिलिरुबिन लाल रक्त पेशीमध्ये प्रामुख्याने आढळते. जेव्हा या पेशी नष्ट होतात तर लिव्हर यांना रक्त प्रवाह द्वारे फिल्टर करतो. लिव्हर मध्ये काही समस्या निर्माण झाल्यास रक्त या पेशींना व्यवस्थित फिल्टर करू शकत नाही, अशा वेळी बिलीरुबिनची मात्रा वाढून जाते. या कारणामुळे आपली त्वचा, डोळे यांचा रंग पिवळा होऊ शकतो.

अचानक वजन कमी होण्याची समस्या

अनेक आजारपणामुळे लिव्हरवर गंभीर परिणाम देखील होऊ शकतो. ज्यामुळे तुमचे वजन भविष्यात कमी होते किंवा अनेकदा परिस्थितीमध्ये आपले वजन अचानक दिवसेंदिवस कमी होत जाते. लिव्हर आपल्या पचनसंस्थे संबंधित अत्यंत महत्त्वाचे कार्य बजावत असते. आपल्या शरीरातील लिव्हर व्यवस्थित कार्य करत नसेल तर आपल्याला भूक देखील लागत नाही. भूक न लागल्यामुळे आपण काही पदार्थ खात नाही, परिणामी आपले वजन कमी होते. जर तुम्हाला वरीलपैकी काही लक्षणे आढळून आल्यास या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.अन्यथा भविष्यात वेगवेगळ्या गंभीर आजारांना तुम्हाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या

नेहमी थकल्यासारखं वाटतं? या वाईट सवयींमुळे बिघडते आरोग्य

जास्त मीठाचं सेवन करताय? आजच आहारातून कमी करा, टक्कल पडण्यासोबतच अनेक दुष्परिणाम…

लेट नाईट हंगर?… हे 5 हेल्दी पदार्थ नक्की मदत करतील

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.