सफरचंदाची साल फेकताय… अनेक पध्दतीनेही होऊ शकतो उपयोग
सफरचंदाची उरलेली साल अनेकांना आवडत नाही. त्यामुळे सफरचंद सोलून खाण्याला अधिक प्राधान्य असते. शिवाय लहान मुलांना सफरचंदाची प्युरी करतानाही साल काढून टाकली जाते. परंतु या सालचा उपयोग करुन आपले जेवण अधिक रुचकर बनवू शकतात.
दररोज एक सफरचंद (Apple) खा आणि डॉक्टरपासून लांब रहा असा सल्ला आपणास अनेकांकडून देण्यात येत असतो. सफरचंदात लोहासह अनेक सकस घटक असतात. त्यामुळे आपल्या दररोजच्या डाएटमध्ये एक सफरचंदाचा समावेश करण्याचा सल्ला आपल्याला तज्ज्ञांकडूनही देण्यात येत असतो. अनेकांना सफरचंद आवडते. परंतु काहींकडून सफरचंद सोलून खाण्यात येत असते. लहान मुलांना सफरचंदाची प्युरी करतानाही साल काढून टाकली जाते. सोललेल्या सफरचंदाची साल (Apple peel) आपण कचराकुंडीत फेकत असतो. परंतु याच सालीचा वापर आपण अनेक ठिकाणी करु शकतो, हे अनेकांना माहिती नाही. साल फेकून देण्यापेक्षा तीचा इतर अन्नघटकांमध्ये वापर केल्यास आपले जेवण (Food) अधिक रुचकर होण्यास मदत मिळत असते.
सफरचंद आणि दालचिनी चहा
एका पातेल्यात पाणी घ्या त्यात दालचिनीचा लहानसा तुकडा टाका. यानंतर कढईत सफरचंदाची साल शिजवा. थोडा वेळ शिजवल्यानंतर ते गाळून घ्या आणि चवीनुसार त्या मिश्रणात मध घाला. या चहाचे सेवन केल्यास आरोग्य आणि त्वचेला दोन्हींना फायदेशीर ठरते.
‘सॅलड’मध्ये सालचा वापर
आपल्या रोजच्या आहारात ‘सॅलड’चा वापर करणे अत्यंत महत्वाचे असते. यातील फायबरमुळे अन्न पचायला सोपे जाते. शिवाय यातून पाण्याची कमतरताही दूर होण्यास मदत होत असते. सफरचंदाच्या सालींचे छोटे आणि लांब तुकडे करुन सफरचंदाच्या पट्ट्या फळ किंवा भाज्यांच्या सॅलडवर ठेवल्यास ‘सॅलड’ची चव अधिकच रुचकर लागते.
सफरचंदाचा जाम बनवा
जाम बनवण्यासाठी सफरचंदाची साल आणि पाणी एका पॅनमध्ये ठेवा. नंतर ते मऊ होईपर्यंत उकळा त्यात चवीनुसार साखर घालून पुन्हा उकळा, सुमारे एक ते दोन कप लिंबाचा रस पिळून हे मिश्रण चांगले ढवळा. यानंतर हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. हे जाम आपण ब्रेड किंवा पोळीसोबतदेखील खाउ शकतो.
केकसाठीही होतो वापर
सफरचंदाच्या सालीचा वापर आपण विविध बेकरी प्रोडक्टसाठीही करु शकतो. केकमध्ये तसेच विविध सजावटींच्या साधनांमध्येही सफरचंदची साल वापरता येते. सफरचंदाच्या सालीत फायबर मोठ्या प्रमाणात असते. शिवाय सजावटीच्या कृत्रिम साधनांचा वापर करण्यापेक्षा सफरचंदाची साल वापरण्यास योग्य ठरते.
भांड्यांचे डाग निघतात
अॅल्युमिनियमच्या भांड्यांचे डाग काढण्यासाठीही सफरचंदाची साल उत्तम ठरते. यासाठी, प्रथम सफरचंदाच्या सालींना पाण्याने उकळा आणि नंतर ते सुमारे अर्धा तास मंद गॅसवर ठेवा आणि नंतर भाड्यांसाठी वापरा. सफरचंदाच्या सालीतील आम्ल अॅल्युमिनियम भाड्यांचे डाग काढण्यास उपयुक्त ठरते.
संबंधीत बातम्या :
बॉडी शेव्हिंग केल्यावर त्वचा कोरडी होते? नितळ त्वचेसाठी हे उपाय ठरतील फायदेशीर…