काही केलं तरी वजन कमी होत नाही आहे, मग करा या 4 गोष्टी…
वजन कमी करायचं असेल तर पाणी भरपूर प्या. खास करुन गरम पाणी प्या. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नक्की फायदा होईल.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे वर्क फ्रॉम होम (Work from home) कल्चर मोठ्या प्रमाणात आलं आहे. अगदी ऑफिसमध्येही एकाच जागी बसून काम करावं लागतं. त्यात बाहेरच्या खाण्यावर भर असतो. त्यामुळे अनेकांचं वजन झपाट्याने वाढलं आहे. त्यात योगा, डाएट करुनही वजन कमी (lose weight) होत नाही. चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचा फायदा नाही नुकसान होतं. अनेक वेळा आपण चुकीच्या डाएटमुळे आपलं वजन वाढतं. कमी झोप, कामाचा वाढलेला ताण आणि अवेळी खाल्ल्यामुळे वजनावर परिणाम होतो. रात्री उशिरा जेवणं आणि त्यानंतर लगेच झोपणं या सवयी अनेकांचं वजन वाढतं. व्यायाम (Exercise) करण्याची सवय नसल्यामुळे आपल्या शरीरावर अनेक परिणाम होत असतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी भन्नाट आयडिया देणार आहोत. या 4 गोष्टी केल्यास तुमचे वजन नक्की कमी होईल.
1. रिफाइंड कार्बोहाइड्रेट्स कमी खा
तुम्हाला झपाट्याने वजन कमी करायचं असेल तर सगळ्यात पहिले साखर बंद करा. तसंच रोजच्या खाण्यातून स्टार्चसह कार्बोहायड्रेट्स गायब करा. या गोष्टी केल्या तर तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. तर आहारात धान्याचा समावेश करा ज्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटेल आणि तुम्हाला भूक कमी लागेल. हे केल्यास तुमच्या शरीरातील कॅलरीजचं प्रमाण आपोआप कमी होईल. आणि तुमचं वजन कमी होण्यास सुरुवात होईल.
2. भाज्या खाण्यावर जास्त भर द्या
आपल्या शरीराला हेल्दी फॅटची गरज असते. त्यामुळे आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. तसंच भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या खाव्यात. तुम्ही मासांहारी असाल तर मटन, मासे, अंडी तसंच बीन्स, टोफू खा. तर भाज्यांमध्ये ब्रोकोली, फ्लॉवर, पालक, कोबी आणि काकडी यांचा आहारात समावेश करा. तसंच सगळ्यात महत्त्वाचं अन्न शिजवण्यासाठी अँव्होकॅडो आणि ऑलिव्ह आइलचा वापर करा.
3. नियमित व्यायाम करा
वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला आहारातील बदलासोबत नियमित व्यायाम करण्याची गरज आहे. आठवड्यातून किमान 4 वेळा ट्रेनरच्या उपस्थित व्यायाम करा. नाही तर चालणे, जॉगिंग, सायकलिंग किंवा पोहणे या सारखे व्यायाम तुम्ही करा.
4. पाणी भरपूर प्या
वजन कमी करायचं असेल तर पाणी भरपूर प्या. खास करुन गरम पाणी प्या. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नक्की फायदा होईल.
टीप – वजन कमी करण्यासाठी वर दिलेले वरील सर्व पर्याय हे सर्वसामान्य असून जर तुम्हाला गंभीर समस्या किंवा आजार असतील तर कृपया तज्ज्ञांच्या सल्ल्या जरुर घ्यावा. त्यानंतर वजन कमी करण्यासाठीच्या उपायांवर काम करावं.