तुम्ही दाताखाली नखे चावता? या सवयीपासून अशी मिळवा मुक्ती
बहुतेक लोकांना दाताखाली नखे चावण्याची (chew nails) सवय असते. सहसा ही सवय काहीवेळा तणावामुळे असू शकते. अनेकांना ही सवय लहानपणापासून असते, तर अनेकांना टेन्शन आल्यानंतर दाताखाली नखे चावण्याची सवय (habit) असते.
बहुतेक लोकांना दाताखाली नखे चावण्याची (chew nails) सवय असते. सहसा ही सवय काहीवेळा तणावामुळे असू शकते. अनेकांना ही सवय लहानपणापासून असते, तर अनेकांना टेन्शन आल्यानंतर दाताखाली नखे चावण्याची सवय (habit) असते. या सवयीचा परिणाम एकंदर आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. शिवाय नखांमधील घाण पोटात जाऊन पोटाशी संबंधित अनेक आजारही निर्माण होऊ शकतात. तसेच अनेकदा ही सवय आपली प्रतिमा खराब करण्यासाठीही कारण ठरू शकते. अशा परिस्थितीत या लेखात काही घरगुती उपायांवर (home remedies) चर्चा करणार आहोत, ज्यामुळे नखे चावण्याची सवय सुटू शकते.
पोटाच्या विकारांचा धोका
शक्यतो लहान मुलांमध्ये बोटे तोंडात घालणे किंवा दाताने नखे कुरतडण्याचे प्रकार बघायला मिळत असतात. या शिवाय प्रौढांमध्येही ही सवय दिसते. परंतु यामुळे नखातील घाण पोटात जावून पोटाचे अनेक विकार निर्माण होउ शकतात. पोटाच्या आजारांमुळे आपल्या चयपचय क्रियेवरही याचा परिणाम होउ शकतो. त्यामुळे वेळीच ही सवय दूर करणे अत्यंत आवश्यक असते. अनेकदा मोठ्यांची नक्कल करुन लहान मुलांनाही ही सवय लागण्याची शक्यता असते.
अशा पद्धतीने सवय होईल दूर
– यावर पहिला उपाय म्हणजे हाताच्या बोटांची नखे लहान ठेवणे. यामुळे नखे चावण्याची सवय कधीच लागणार नाही. कारण तुम्ही नखे चावण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुमच्या हातातील नखे लहान असतील शिवाय त्यामुळे पोटाचा संसर्ग होणार नाही.
– मॅनिक्युअर प्रक्रियेत नखे सुंदर बनतात. जेव्हा तुमची नखे दिसायला सुंदर असतात, तेव्हा त्यांना दाताखाली चावण्याची इच्छा होत नाही.
– त्याचप्रमाणे तुम्ही नखांवर खराब चवीचे नेलपेंट लावू शकता. यामुळे तुमची सवय मोडेल. तुम्ही नखे चावता तेव्हा त्याची खराब चव नखे चावण्यापासून रोखू शकते. तुम्ही नखांमध्ये कोणत्याही नेल अॅक्सेसरीज वापरू शकता किंवा तुम्ही ते पट्टीने झाकून ठेवू शकता. असे केल्याने नखे चावण्याची सवय दूर होईल.
– याशिवाय तुम्हाला कोणत्या परिस्थितीत नखे चावण्याची इच्छा आहे, हे ओळखण्याचा प्रयत्न करा. सोबतच, अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे लक्ष दुसरीकडे वळवून नखे चावण्याच्या सवयीपासून दूर झाले पाहिजे.