तुम्हालाही येतोय का वारंवार ताप.. असु शकतो कोरोना संक्रमणाचा संकेत; कोरोना रुग्णांमध्ये दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
COVID-19 ची नवीन लक्षणे: देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्णांमुळे आरोग्य विभागाने सर्वांना खबरदारीचा सल्ला दिला आहे. कोरोनाची लक्षणे खूप बदलत आहेत. सध्याच्या परिस्थीतीत काही सामान्य लक्षणे देखील कोरोना संक्रमणाची असू शकतात.
देशात कोरोनाचा वेग (Corona speed) सातत्याने वाढतोय. गेल्या 24 तासांबद्दल बोलायचे झाले तर 17 हजार 092 नवीन रुग्ण आढळले आहेत. अलीकडच्या काळात, कोरोनाचे नवीन व्हेरियंट देखील समोर आले आहेत. ज्यामुळे, कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. भारताव्यतिरिक्त इंग्लंड-अमेरिका बद्दल बोलायचे झाले तर, Omicron चे subvariants BA.4 आणि BA.5 हे, तिथल्या कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण असल्याचे मानले जाते. वाढत्या केसेस पाहता पाचवी लाट येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. भारतातील दैनंदिन प्रकरणाबद्दल बोलताना तज्ञांनी सावधगिरी (Caution) बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सतत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये काही सामान्य लक्षणे दिसून येत आहेत. तुम्हालाही यापैकी काही लक्षणे दिसत असल्यास, ते कोरोनाचे संकेत असु शकतात. त्यामुळे कोरोनाशी निगडीत कुठलीही लक्षणे दिसली तर, त्वरीत वैद्यकीय मदत (Medical help) घेणे योग्य ठरते.
सतत म्युटेट हेातोय व्हायरस
कोरोना व्हायरस सतत म्युटेट (उत्परिवर्तन) होत आहे. ज्यामुळे त्याची लक्षणे सतत बदलत आहेत. कोरोनाची लक्षणे ओळखणाऱ्या ZOE Covid Study मोबाईल अॅप्लिकेशनवर लोकांनी त्यांच्या लक्षणांबद्दल सांगितले आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णच या अॅप्लिकेशनवर त्यांची लक्षणे शेअर करतात. किंग्ज कॉलेज लंडनच्या सहकार्याने अशा लोकांद्वारे नोंदवलेल्या लक्षणांवरील डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. या डेटाच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, कोविड पॉझिटिव्ह होण्यापूर्वी 69 टक्के लोकांना डोकेदुखी होती. अर्थात ही डोकेदुखी कोरोनाच्या लक्षणांपैकी एक आहे. काही लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास होण्यापूर्वीच डोकेदुखी होऊ शकते.
ताप हे देखील मुख्य लक्षण आहे
कोलकता येथील खासगी रुग्णालयातील तज्ञांचे म्हणणे आहे. की, कोविड-19 च्या सध्याच्या प्रकरणांमध्ये उच्च ताप हे मुख्य लक्षण आहे. मात्र, पूर्वीच्या कोव्हीड लाटे प्रमाणे श्वासोच्छ्वास, खोकला, सर्दी, वास आणि चव कमी होणे ही लक्षणे अद्याप दिसून आलेली नाहीत. सीएमआरआय हॉस्पिटलच्या पल्मोनोलॉजीचे संचालक राजा धर यांच्या मते, कोरोना लागण झाल्यावर दोन-तीन दिवस जास्त ताप येतो. यानंतर तो चौथ्या किंवा पाचव्या दिवशी कमी होतो. मुंबई आणि दिल्लीतील बहुतेक कोविड रुग्णांमध्येही अशीच लक्षणे आढळून आली आहेत.
प्रत्येक लाटेत होत आहे कमकुवत
आरएन टागोर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियाक सायन्सेस चे शास्त्रज्ञ सौरेन पंजा म्हणाले की, विषाणू प्रत्येक कोरोना लाटेमध्ये कमकुवत होत जातो, ज्यामुळे त्याची लक्षणे आणि प्रसाराची तीव्रता देखील कमी होते. तिसऱ्या लाटेतील लक्षणे दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सौम्य होती आणि नंतर आणखी सौम्य होतील. आतापर्यंत, कोविड पॉझिटिव्ह लोकांमध्ये सौम्य आणि मध्यम ताप हे एकमेव लक्षण दिसून आले, परंतु ज्यांना पूर्णपणे लसीकरण झालेले नाही त्यांना जास्त धोका असू शकतो.
प्रत्येकाचे लसीकरण आवश्यक
पिअरलेस हॉस्पिटलमधील क्लिनिकल रिसर्च संचालक सुब्रोज्योती भौमिक यांच्या मते, बहुतेक लोकांना लसीकरण झाले आहे. लसीकरणानंतर आपल्या शरीरात विषाणूशी लढण्यासाठी अँटीबॉडीज् तयार हेातात. जेव्हा या अँटीबॉडीज विषाणूशी लढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ताप येतो. जर एखाद्याला ताप आला असेल तर शरीरातील अँटीबॉडीज या कोरोनाच्या तापाशी लढत असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याचे समजते. यासाठीच प्रत्येकाने लसीकरण करणे आवश्यक आहे.