Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाश्त्यामध्ये ‘कॉर्नफ्लेक्स’ खाताय? वेळीच व्हा सावध, तुम्हाला लठ्ठपणा, मधुमेहासारख्या समस्यांना आमंत्रण देताय…

कॉर्नफ्लेक्स चविष्ट बनवण्यासाठी किंवा त्याचा अधिक फायदा मिळवण्यासाठी लोक ते जास्त प्रमाणात खाण्याची चूक करतात. ही पद्धत आपल्या शरीरात आरोग्य समस्यांचे घर बनवू शकते. जाणून घ्या कॉर्नफ्लेक्स खाण्याचे तोटे...

नाश्त्यामध्ये ‘कॉर्नफ्लेक्स’ खाताय? वेळीच व्हा सावध, तुम्हाला लठ्ठपणा, मधुमेहासारख्या समस्यांना आमंत्रण देताय...
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 3:52 PM

मुंबई : निरोगी राहण्यासाठी, आपले अन्न चांगले असणे सर्वात महत्वाचे आहे. आरोग्य तज्ञ आणि आहारतज्ञ देखील सल्ला देतात की, जर तुमची खाण्याची दिनचर्या (Eating routine) चांगली असेल तर अनेक आजारही तुमच्यापासून दूर राहतात आणि तुम्ही स्वस्थ जिवन जगु शकतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी काहीही खाणे आणि त्यासाठी कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यास शरीराला त्याच्या फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी नाश्ता आणि दुपारचे जेवण जड असावे. या कारणास्तव, नाश्त्याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. आजकाल लोक जेवणाशी संबंधित ट्रेंडमुळे काहीही करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कॉर्नफ्लेक्सचा नाश्ता (Cornflakes breakfast) करण्याचे अनेकांना आवडते. सकाळी ते खाने खूप आरोग्यदायी (Very healthy) आहे असे वाटत असल्याने, लोक ते आवडीने खातात, परंतु शरीरासाठी ते किती फायदेशीर आहे किंवा नाही हे जाणून घेण्याची तसदी कुणीही घेत नाहीत.

अधिक कॅलरीजमुळे वजन वाढ

लोक नाश्त्यात दुधासोबत कॉर्नफ्लेक्स खूप आवडीने खातात, पण तुम्हाला माहित आहे का की ते शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढवू शकतात. कॅलरीजचे जास्त सेवन केल्याने वजन वाढते आणि काही दिवसांनी तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. तज्ज्ञांच्या मते कॉर्नफ्लेक्समध्येही पोषणाची कमतरता असते. अशा परिस्थितीत हे अन्न आठवड्यातून एक किंवा दोनदाच खा आणि तेही कमी प्रमाणात.

ग्लायसेमिक निर्देशांक अधिक

तुम्हाला माहित आहे का की, कॉर्नफ्लेक्सचे जास्त सेवन केल्याने तुम्हाला मधुमेहाचीही समस्या त्रास देऊ शकते. असे म्हटले जाते की कॉर्नफ्लेक्स मध्ये खूप उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आहे. त्यामुळे ते, शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. ग्लायसेमिक इंडेक्स कोणत्याही अन्नामध्ये रक्तातील साखर किती आहे हे सांगते. साधारणपणे 55 चा निर्देशांक चांगला मानला जातो, तर कॉर्नफ्लेक्समध्ये तो 80 च्या जवळ असतो. म्हणून, ते फक्त कमी प्रमाणात खा. पचन संस्था बिघडते

तज्ञांच्या मते, कॉर्नफ्लेक्समध्ये फायबरचे प्रमाण कमी असते आणि ते दररोज खाल्ल्याने पचन बिघडू शकते. फायबरच्या कमतरतेमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. या स्थितीत चयापचय गतीही मंदावते आणि पोटाशी संबंधित समस्या तुमच्या शरीरात होऊ लागतात. सुरुवातीला तुम्हाला याचे सेवन करायला आवडेल, पण ते रोज खाणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.