ऑफिसमध्ये झोप येते? ‘या’ 2 गोष्टी करून बघा
अनेकदा यामुळे काम कमी होते, डोकं चालत नाही, या परिस्थितीला अजिबात हलक्यात घेऊ नका, अन्यथा अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवणासाठी अशा गोष्टी करणं चांगलं.
मुंबई: आपल्यापैकी काही जण असे असतात ज्यांना ऑफिसमध्ये काम करताना लवकर थकवा यायला लागतो, मग आळशीपणा आणि अंगदुखीला सामोरे जावे लागते, अशा परिस्थितीत सामान्यपणे काम करणे कठीण होऊन बसते. अनेकदा यामुळे काम कमी होते, डोकं चालत नाही, या परिस्थितीला अजिबात हलक्यात घेऊ नका, अन्यथा अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवणासाठी अशा गोष्टी करणं चांगलं. ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकता ते जाणून घेऊया.
थकवा दूर करण्यासाठी सकाळी करा ‘या’ 2 गोष्टी
दिवसभर थकवा किंवा सुस्तीतून जायचे नसेल तर सकाळपासूनच उपाय करावे लागतील. झोपेतून उठून नवी जीवनशैली स्वीकारावी लागेल. जाणून घेऊया सविस्तर.
- सकाळी उठल्यानंतर आधी वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश व्हा आणि मग लगेच मॉर्निंग वॉकला निघा, 30 मिनिटं ते एक तास चाललो तर शरीराला थोडी ऊर्जा मिळेल.
- सकाळी 15 मिनिटे चालल्यास तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील कारण इस्ट्रोजेन आणि डोपामाइन सारख्या हॅपिनेस हॉर्मोन्सची पातळी वाढेल आणि तुम्हाला टेन्शन देणाऱ्या कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी कमी होईल. हे आपल्याला तणावापासून वाचवेल, जे दिवसभराच्या थकव्याचे एक प्रमुख कारण असू शकते.
- सकाळी उठून चालल्याने तुमच्या स्नायूंना आणि हाडांना कमालीची ताकद मिळते, ज्यामुळे थकवा आणि अंगदुखीची समस्या कमी होते.
- मॉर्निंग वॉकचा चांगल्या झोपेशी थेट संबंध आहे. जर तुम्ही रात्री शांत झोप घेत असाल तर दिवसा थकवा नगण्य राहील.
- हल्ली लहान-मोठ्या सर्वच शहरांतील बहुमजली इमारतींमध्ये लिफ्टचा वापर खूप जास्त आहे, सोयीस्कर आहे, पण लिफ्टचा वापर माणसाला खूप आळशी बनवतो. पण तुम्ही सकाळी उठून किमान 10 ते 15 मिनिटं पायऱ्या चढा असे केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण वाढेल. पाणी प्यायल्याशिवाय हे काम करू नका.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)