Health: तळलेले पदार्थ खाण्याचे शौकीन आहात? मग त्याच्या परिणामाबद्दल अवश्य जाणून घ्या
तळलेले अन्न पदार्थ हे चविष्ट असतात, मात्र त्याचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम तुम्हाला माहिती आहे काय?

तळलेले पदार्थ Image Credit source: Social Media
मुंबई, तळलेले अन्न (Fried food) पदार्थ जवळजवळ संपूर्ण जगभरात खाल्ले जातात. तळलेले पदार्थ अत्यंत स्वादिष्ट असल्याने अनेक जण त्यावर ताव मारतात. तळलेले पदार्थ बनविण्यासाठीची लागत देखील कमी असल्याने रेटॉरंटमध्येदेखील तळलेल्या पदार्थांचे प्रकार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. मात्र तळलेले अन्न खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम (dangerous for Health) होऊ शकतात हे तुम्हाला माहीत आहे का? तळलेले अन्न आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे, म्हणून सर्व डॉक्टर ते टाळण्याचा सल्ला देतात. तळलेल्या अन्नाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी घेऊन जाणून घेऊया.
तळलेले अन्नाचे तोटे
- कॅलरीचे प्रमाण जास्त असते- तळलेल्या अन्नामध्ये इतर पदार्थांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. तळलेले अन्न कॅलरीजमध्ये जास्त असते तसेच चरबीचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुमची कॅलरी वाढते आणि लठ्ठपणा व इतर रोग होऊ शकतात.
- तळलेल्या अन्नामध्ये ट्रान्स फॅट असते- तळलेल्या अन्नामध्ये हानिकारक ट्रान्स फॅट जास्त प्रमाणात आढळते, जे शरीराला पचण्यासाठी खूप कठीण असते. ट्रान्स फॅट शरीरासाठी विषासमान असते. तेलात अन्न शिजवल्याने ट्रान्स फॅट वाढते, ज्यामुळे तुम्ही मधुमेहासारख्या अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.
- तळलेले अन्न शरीरात रोगांचा धोका वाढवते- आरोग्य तज्ञांच्या मते, तळलेले अन्न जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्ही अनियंत्रित रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल पातळी यांसारख्या अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकते. तळलेल्या अन्नामुळे टाइप-2 मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित आजार होतात.
- तळलेल्या अन्नामध्ये असते हानिकारक ऍक्रिलामाइड- Acrylamide हा एक हानिकारक पदार्थ आहे, जो मुख्यतः तळलेल्या अन्नामध्ये आढळतो. तज्ज्ञांच्या मते, ऍक्रिलामाइड-युक्त पदार्थांचे सेवन केल्याने कर्करोगाची शक्यता बळावते.
हे सुद्धा वाचा

व्हॉट्सॲपचे नवीन सुरक्षा फीचर! नाही काढता येणार फोटो-व्हिडिओचा स्क्रीनशॉट

Astrology: आजचे राशी भविष्य, या’ तीन राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

Diabetes Tips: डायबिटीजमध्ये उपयुक्त आहे हा घटक, कोलेस्ट्रॉलदेखील ठेवते नियंत्रणात

Home Loan: गृह कर्ज घ्यायचे आहे का? जाणून घ्या कोणत्या बँकेत किती व्याजदर आहे