Back Pain : सकाळी उठल्यावर पाठदुखी होते का? हयगय करू नका.. ताबडतोब डॉक्टरांना भेटा!
सकाळी उठल्यावर पाठदुखी होणे सामान्य गोष्ट नाही. अनेक महिलांना वयाच्या तीशीतच पाठदुखीची समस्या सुरू होते. सकाळी उठताच पाठदुखी सुरू होते. यापासून आराम मिळावा म्हणून अनेक जणी पेनकीलर खावून रोजची कामे करतात. परंतु, हे आरोग्यासाठी अत्यंत हाणीकारक ठरू शकते. जाणून घ्या, पाठदुखीची कारणे आणि त्यावरील उपचार.
सकाळी उठताच पाठीत सनक उठणे, तीव्र पाठदुखी (Severe back pain) होणे ही सामान्य लक्षणे नसून आरोग्याच्या बाबत ही धोक्याची घंटा ठरू शकते. सकाळी उठल्यानंतर मला पाठदुखी का होते? याबाबत फरीदाबादमधील ऑर्थोपेडिक, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ. राजीव ठुकराल यांनी सांगीतले की, साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती झोपलेली असते तेव्हा कंबरेला विश्रांती मिळते. त्यामुळे झोपून उठल्यानंतर वेदना होऊ नयेत. पण जर तुमचे स्नायू कमकुवत (Muscle weakness) असतील तर असे होऊ शकते. काहीवेळा जर एखाद्या विशिष्ट प्रकारचा संधिवात असेल ज्याला अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतात, तर त्यामुळे पाठदुखी होते. सांधेदुखीचा (Arthritis) दुसरा प्रकार असला तरी पाठदुखी होते. कधीकधी डिस्क किंवा कॅनल स्टेनोसिसची समस्या असते, ज्यावर उपचार केले जात नाहीत, त्यामुळे वेदना देखील होतात. अशी तीन ते चार कारणे आहेत ज्यामुळे सकाळी पाठीत वेदना होतात.
संधिवाताची लक्षणे
जर झोपेतून उठल्यानंतरच पाठदुखी होत असेल आणि 5 मिनिटांत बरी होते. तर हे सहसा शरीर आणि स्नायूंच्या कमकुवतपणामुळे होते. पण इतर सांध्यांमध्येही दुखत असेल किंवा सूज येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, किंवा उठल्यानंतर अर्ध्या तासाहून अधिक काळ शरीराला थोडी ऊब मिळेपर्यंत कडकपणा असेल. मग ते संधिवात लक्षण असू शकते.
6 पाठदुखीची लक्षणे, ठिकाणे, उपचार आणि कारणे
काहीवेळा जर एखाद्या विशिष्ट प्रकारचा संधिवात असेल ज्याला अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतात, तर त्यामुळे पाठदुखी होते. या प्रकरणात, डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे. जर रात्री देखील वेदना होत असतील आणि सकाळी देखील वेदना होत असतील तर ते पाठीच्या कण्यातील क्षयरोगाचेही लक्षण असू शकते. जर ही वेदना केवळ कंबरेतच नाही तर पायातही जात असेल तर याचा अर्थ तुमच्या नसांवर दबाव आहे. हे दुखणे कंबरेपासून सुरू होते, पण नसांवर दाब पडल्याने ते पायापर्यंत जात आहे. अशावेळी डॉक्टरांना नक्की भेटा.
या व्यायामामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो
जर असे आढळून आले की संसर्ग, डिस्कची समस्या किंवा संधिवात नाही. जर वेदनांचे कारण फक्त कमकुवत स्नायू असेल तर काही अतिशय साधे व्यायाम मदत करू शकतात. अशा वेदनांसाठी 3 योगासने खूप चांगली आहेत.
पहिले पवनमुक्तासन – यामध्ये सरळ झोपून गुडघे वाकवून पोटापर्यंत दाबून ठेवा. थोडा वेळ ठेवा. मग सोडून मूळ स्थितीत या.
दुसरे म्हणजे सेतू बंधनासन – याला ब्रिजिंग पोझ असेही म्हणतात. यामध्ये सरळ झोपून कंबर वर केली जाते.
तिसरे म्हणजे भुजंगासन किंवा नौकासन – यामध्ये पोटावर झोपून, हाताच्या साहाय्याने किंवा आधाराशिवाय डोके व छाती मागे उभी केली जाते.
उपचार आवश्यक
पाठदुखीचे कारण माहित असेल तर त्यावर उपचार करणे सोपे होते. जेथे कारण स्पष्ट आहे, तेथे विशेष उपचार असू शकतात. जर कारण संसर्ग असेल तर त्यावर उपचार केल्याने वेदना दूर होतात. पण जर ह्यांचे काही कारण नसेल तर सांगितलेली योगासने करा. त्यामुळे पाठदुखीला साधाऱण न समजता त्वरीत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळीच उपचार सुरू करा.