हे पेय तुमचं वजन झटकन कमी करू शकतं!
ता आजच्या बिझी लाईफमध्ये प्रत्येकाला ट्रेडमिलवर तासन् तास धावण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. अशावेळी तुम्ही एखाद्या खास ड्रिंकचा आधार घेऊ शकता.
जेव्हा लठ्ठ व्यक्तीला वजन कमी करण्याचं चॅलेंज दिलं जातं तेव्हा त्याला घाम येऊ लागतो. पोट आणि कमरेची चरबी कमी करणे हे खूप कष्टाचे काम आहे, त्यासाठी कसरत आणि कडक आहार नियंत्रण आवश्यक आहे. आता आजच्या बिझी लाईफमध्ये प्रत्येकाला ट्रेडमिलवर तासन् तास धावण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. अशावेळी तुम्ही एखाद्या खास ड्रिंकचा आधार घेऊ शकता. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितले की, ॲपल साइडर व्हिनेगर नियमित आणि योग्य प्रकारे प्यायल्यास पोटातील चरबी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
ॲपल साइडर व्हिनेगर आंबवून तयार केले जाते, ज्यामुळे ते सफरचंदाच्या रसापेक्षा थोडे वेगळे होते, त्याची टेस्ट देखील लक्षणीय बदलते. हे सफरचंदाच्या रसाचे एक अम्लीय रूप आहे जे पातळ फिगर मिळविण्यात मदत करते.
ॲपल साइडर व्हिनेगर शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते, तसेच हे कमी कॅलरीयुक्त पेय आहे जे चरबी वाढवत नाही, त्यात कार्बोहायड्रेट देखील खूप कमी आढळते. हे आपले चयापचय देखील सुधारते.
ॲपल साइडर व्हिनेगरचे सेवन कसे करावे?
ॲपल साइडर व्हिनेगर पिण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे ॲपल साइडर व्हिनेगर घाला. हे जादुई पेय सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी प्या. थेट ॲपल साइडर व्हिनेगर पिऊ शकत नाही, कारण यामुळे दात खराब होणे, छातीत जळजळ होणे आणि घशात दुखणे होऊ शकते.