अनेकांना अचानक बेचैन का वाटतं, काय होतो नेमका त्रास, घ्या जाणून…!
अनेक वेळा आपण कारण नसतानाही अचानक घाबरतो, आपल्याला घाम फुटायला लागतो मन बेचैन होतं. मग अशावेळी तुम्हाला एंग्जाइटी (Anxiety)हा रोग असण्याची शक्यता आहे. आणि पुढे जाऊन हा आजार गंभीर स्वरुप घेऊ शकतो. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घ्या.
आपण एखाद्या कार्यक्रमासाठी तयार झालो आहे आणि अचानक तुम्हाला भीती वाटायला लागते. की तिथे कोणी आपल्याशी बोलेल का, काय म्हणतील आपल्याला आणि व्यवस्थित दिसतोय. या आणि अशा असंख्य प्रश्नांसोबत आपण त्या कार्यक्रमात पोहोचतो. आणि तिथे आपल्याशी कोणी बोलायला आल्यावर आपल्याला अचानक घाम फुटतो आणि घाबरतो. अशा अवस्थेला एंग्जाइटी (Anxiety) असं म्हणतात म्हणजे चिंतेचा विकार. म्हणजे तुम्हाला एंग्जाइटी डिसऑर्डर असू शकतो. आता हा आजार कोणाला होतो, याची काय लक्षणं आहेत आणि काय उपचार आहे हे जाणून घेऊयात.
एंग्जाइटी (Anxiety) म्हणजे नेमकं काय होतं?
हा आजार तुमच्या मानसिक स्वास्थासोबत जोडला आहे. याचा अर्थ तुम्ही मानसिक रोगी नाही किंवा पागलही नाही. अनेक लोकांनाचा हा गैरसमज आहे की मानसिक आजार म्हणजे तुम्ही पागल आहात असं मुळीच नाही. एंग्जाइटी असणाऱ्याला अचानक घाबरल्या सारखे वाटणे, त्याचा मनात नकारात्मक विचार घरं करणे त्यातून चिंता वाटणे अशा गोष्टी होतात. तसंच हाथ थरथरने, घाम येणे, भीती वाटणे, मनात शंका येणे, काही कारण नसताना रडणे यासारख्या गोष्टी पण या रुग्णासोबत होतात. ज्या लोकांना अनेक दिवस झोप येत नाही अशा लोकांना एंग्जाइटी होण्याची भीती जास्त असते. आणि या एंग्जाइटीतून काही रुग्णांना हृदयविकाराचा त्रासही होतो.
एंग्जाइटीचे मुख्य कारणं
1. अधिक टेन्शन घेणे
2. घटनेचा मनावर परिणाम होणे
3. मनावर कुठली गोष्ट घर करुन बसणे
4. मनातील गोष्ट कोणालाही शेअर न केल्यामुळे
5. सतत नकारात्मक विचार करणे
6. एखाद्या व्यक्तीवर नकारात्मक विचारा मारा
यावर उपचार आहे का?
तर हो, यावर उपचार आहे. सगळ्यात पहिले आपल्या मनातील गोष्ट कोणाला तरी सांगा. म्हणतात मन हलकं केलं की दु:ख नाहीस होतं. कुठलीही गोष्ट मनात ठेवू नका. कोणातरीकडे आपलं मनातलं बोलत जा. या आजारावर औषधं पण आहेत. या आजारात सगळ्यात महत्त्वाची भूमिका काउंसलिंग आहे. तसंच योगसाधना करुन तुम्ही मन शांत करु शकता. नेहमी आनंदी राहणे, सकारात्मक विचार करणं आणि कायम स्व:तला व्यस्त ठेवणे. या गोष्टीही महत्त्वाच्या असतात.
काय आहेत उपचार?
1. साइकोथेरेपी – सगळ्यात बेस्ट. या आजारात साइकोथेरेपी सगळ्या बेस्ट असते. या साइकोथेरेपीची रुग्णांना सगळ्यात जास्त मदत होत असते. या थेरेपीमध्ये आपल्याला मनावर नियंत्रण ठेवणं शिकवलं जातं.
2. टेन्शनपासून मुक्ती – या रुग्णांना टेन्शनमधून बाहेर काढणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं या रुग्णांना कधी एकटं सोडू नका. कारण टेन्शनमध्ये हे रुग्ण काहीही करू शकतात. या रुग्णांना कायम मद्यपान आणि सिगरेटपासूनही दूर ठेवलं पाहिजे.
3. हेल्दी खा आणि तणावमुक्त व्हा – या रुग्णांना हिरव्या पालेभाज्या आणि हेल्दी फूड द्या. यांना चुकूनही जंक फूड आणि तेलकट पदार्थ देऊ नयेत. आणि एंग्जाइटी असेलल्या रुग्ण कधीही जेवण स्किप करणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचं आहे.
4. खूष राहा – या रुग्णांसाठी टेन्शन, तणाव घातक होऊ शकतं. म्हणून अशा रुग्णांना कायम आनंदी ठेवा. त्यांना त्यांचा आवडीचा कामात बिझी ठेवा. त्यांच्यामध्ये योगसाधने विषयी गोडी निर्माण करा.
(टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.)
इतर बातम्याः
Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!
Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी