Health : सावधान ! तुम्हालाही श्वास घेण्यास वारंवार त्रास होत आहे का ? असू शकते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सामान्यत: धमन्या ब्लॉक झाल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अनेक कारणांमुळे धमन्या ब्लॉक होऊ शकतात. मात्र अशा परिस्थितीत त्यावर वेळीच उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.

Health : सावधान ! तुम्हालाही श्वास घेण्यास वारंवार त्रास होत आहे का ? असू शकते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण
असू शकते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 4:18 PM

शरीरात असणाऱ्या कोणत्याही गंभीर आजारांचा (Health Problems) अंदाज त्याच्या दिसणाऱ्या लक्षणांच्या आधारे योग्य वेळीच लावला जाऊ शकतो. मात्र काही लक्षणे तुम्हाला गोंधळातही टाकू शकतात. त्यामुळे त्याबद्दल सर्व लोकांनी विशेष सावधगिरी बाळगून काळजी घेण्याची गरज असते. श्वास घेण्यास होणारा त्रास, (breathing Problems) अशीच एक समस्या आहे, जी सामान्यत: फुफ्फुसांची समस्या किंवा दमा मानली जाऊ शकते. पण हे हृदयविकाराच्या (heart problems) झटक्याचे प्राथमिक लक्षणही असू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, श्वसनासंबंधी असलेला कोणताही त्रास किंवा समस्या, याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नये. गंभीर स्थितीमध्ये फुफ्फुसे किंवा हृदयासंबंधी असलेली समस्या प्राणघातकही ठरू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व लोकांनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हे हृदयाच्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला गेल्या काही काळापासून असा ( श्वास घेण्यासंदर्भातील ) त्रास होत असेल तर डॉक्टरांची तातडीने भेट घेऊन यासंदर्भातील चाचण्या जरूर करून घ्याव्यात. वेळेत योग्य निदान झाल्यास गंभीर समस्यांचा धोका अथवा जोखीम कमी करण्यास मदत होऊ शकते.

हृदयरोगाचे लक्षण

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सामान्यत: धमन्या ब्लॉक झाल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अनेक कारणांमुळे धमन्या ब्लॉक होऊ शकतात. मात्र अशा परिस्थितीत त्यावर वेळीच उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. मात्र श्वास घेण्यास त्रास होणे, हे प्रत्येक वेळेस हृदयाशी संबंधित समस्येचे लक्षण असेलच असेही नाही. काही परिस्थितींमध्ये छाती आखडल्यामुळेही असा त्रास होऊ शकतो. मात्र, अशा सर्व समस्यांवर वेळीच उपचार होणे आवश्यक असते. श्वास घेण्यास त्रास होण्याची आणखी काय कारणे असू शकतात, ते जाणून घेऊया.

या कारणांमुळेही श्वास घेण्यास होऊ शकतो त्रास

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्याचे योग्य कारण जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

हे सुद्धा वाचा

– ॲनिमिया ( लाल रक्तपेशींची कमतरता) – ज्या लोकांना ॲनिमियाचा त्रास होतो, त्यांनाही श्वास घेण्यास त्रास होऊ शकते.

– अस्थमाचा त्रास असणाऱ्या लोकांनाही श्वसनाची समस्या जाणवू शकते.

– चिंता किंवा तणावाची परिस्थिती असेल तर हा धोका वाढू शकतो.

– हृदय किंवा फुफ्फुसाची समस्या असेल तर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

– धूम्रपान करणाऱ्या लोकांनाही श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

– कोणता ना कोणता संसर्ग झालेला असल्यास.

– गंभीर जाडेपणा

कसा कमी करता येईल त्रास ?

जर तुम्हाला हृदय किंवा फुफ्फसाचा कोणताही त्रास नसतानाही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्यापासून वाचण्यासाठी काही गोष्टींची जरूर काळजी घ्या.

– जिथे रसायनांचा अधिक वापर होतो, अशा ठिकाणी जाणे टाळा. रसायनांमुळे तुमच्या फुफ्फुसांचा त्रास वाढू शकतो.

– श्वसनाचा व्यायाम केल्यानेही अशा समस्या कमी होतात.

– श्वसनासंदर्भात होणारा त्रास टाळायचा असेल तर धूम्रपान पूर्णपणे बंद करावे.

– वजन आटोक्यात ठेवल्यानेही श्वसनासंदर्भात होणारा त्रास कमी होऊ शकतो.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.