Diet : यो-यो डाएटने ह्रदयरोग अन्‌ मधुमेहाचा धोका?… ही माहिती अवश्‍य जाणून घ्या

एका संशोधनानुसार, यो-यो डाएटमुळे ह्रदयाशी संबंधित आजार व मुधमेहात वाढ होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा यो-यो डाएट नेमका आहे तरी काय? त्यामुळे आजारांचा धोका कसा वाढतो, हे या लेखातून जाणून घेणार आहोत.

Diet : यो-यो डाएटने ह्रदयरोग अन्‌ मधुमेहाचा धोका?... ही माहिती अवश्‍य जाणून घ्या
यो-यो डाएटImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 9:44 AM

मुंबई :  साधारणत: ‘सेलेब्स्‌’मध्ये यो-यो डाएटींगबाबत (Yo-Yo Diet) खूप आकर्षण दिसून येत आहे. त्यांच्यामुळेच यो-यो डाएट हे नावदेखील खूप चर्चेत आले आहे. परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यो-यो डाएट चांगले की वाईट? हा नेमही चर्चेचा विषय ठरत आला आहे. नव्या एका संशोधनातून यो-यो डाएटचे शरीरासाठी खूप नुकसान सांगण्यात आले आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांच्या एका दाव्यानुसार, यो-यो डाएटमुळे ह्रदयाशी संबंधित आजार (Heart Disease) व मधुमेहामध्ये (Diabetes) वाढ होत असल्याचे सांगण्यात आले आहे. संशोधनात सिध्द झाल्यानुसार या डाएटमुळे रक्तातील साखरेच्या पातळीतदेखील वाढ होताना दिसून आली आहे. त्यामुळे परिणामी मधुमेही लोकांच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. वॉशिंग्टन डीसीच्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये सादर करण्यात आलेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.

काय आहे यो-यो डाएट

‘हेल्थलाईन’च्या रिपोर्टनुसार, यो-यो डाएटला ‘वेट साइक्लिंग’देखील म्हटले जाते. या डाएटमध्ये एका खास पध्दतीच्या डाएटची अंमलबजावणी केली जात असते. वेट साइक्लिंगप्रमाणे हा डाएट करत असलेल्या लोकांच्या वजनात चढ-उतार दिसून येत असतो. त्याचे वजन वाढते व पुन्हा कमी होते, पुन्हा वाढत असते. यो-यो डाएटमध्ये पहिल्यांदा वजन कमी होते. नंतर ते पुन्हा वाढत असते. त्यानंतर पुन्हा वजन कमी होण्यास सुरुवात होते. या पध्दतीने या सर्व डाएटची निर्मिती केली जात असते. परंतु तज्ज्ञांच्या दाव्यानुसार अशा प्रकारच्या डाएटमुळे शरीरावर वाईट परिणाम होत असतात.

या मागील धोके काय आहेत?

यो-यो डाएटचा धोका ओळखण्यासाठी शास्त्रज्ञांकडून एका उंदरावर प्रयोग करण्यात आला. उंदरावर प्रयोग केल्यावर धक्कादायक महिती समोर आली. वजन वारंवार कमी-जास्त केल्याने याचा दुष्परिणाम ह्रदय व किडनीवर दिसून आला आहे. ह्रदय व किडनीच्या कार्यक्षमतेत बदल जाणवल्याचे यातून दिसून आले आहे. त्याच प्रमाणे ज्या उंदरांवर यो-यो डाएटचा प्रयोग केला त्यांच्यातील नसांमध्ये रक्तातीत साखरेचे संचलन करण्यातही फरक जाणवल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात आला आहे. परिणामी त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागले होते. संशोधक एलिन डिसूजा यांनी सांगितले, की हा डाडट बंद केल्यानंतर प्राण्यामध्ये काही प्रमाणात ‘रिकव्हरी’ झालेली आहे. परंतु त्यांचे ह्रदय मात्र निरोगी राहू शकले नाही. त्यामुळे वजन वारंवार कमी-जास्त होण्याचा मानवी शरीरावरही दीर्घकालीन परिणाम होउ शकतो.

दरम्यान, ‘डेलीमेल’च्या एका रिपोर्टनुसार, संशोधकांनी आपल्या प्रयोगात 16 मादा उंदरांचा समावेश केला. त्यांना दोन गटात विभागण्यात आले. पहिला गटात यो-यो डाएटचा समावेश करण्यात आला तर दुसर्या गटाला मात्र सामान्य पध्दतीने वागणूक देण्यात आली होती. दोन्ही गटातील उदरांचे अल्ट्रासाउंट पाहिल्यानंतर दोन्ही गटातील उदरांचे ह्रदय व किडनीबाबतच्या कार्यक्षमतेचा विचार करण्यात आला. यो-यो डाएटचे पालन करीत असलेल्या उदरांमध्ये भविष्यात ह्रदयाशी संबंधित रोगांचा धोका वाढताना आढळला.

इतर बातम्या

Aurangabad | वाइन विक्री केल्यास दुकाने फोडू, राज्य सरकारच्या वाइन विक्रीच्या जाहिरातीवरून खासदार इम्तियाज जलील यांचा पुन्हा इशारा

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू; पहा Video

Sangola : वातावरणातील बदलाने डाळिंब बागा उध्वस्त, शेतकरी परिषदेत नेमका तोडगा काय?

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.