बॉडी शेव्हिंग केल्यावर त्वचा कोरडी होते? नितळ त्वचेसाठी हे उपाय ठरतील फायदेशीर…

अनेक महिलांकडून त्वचा चमकदार बनवण्यासाठी ‘हेअर रिमूव्हर’चा वापर केला जात असतो. परंतु यातून कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होत असते. तुम्ही याच समस्येने त्रस्त असाल तर तुमच्यासाठी या काही खास टीप्स फायदेशीर ठरतील.

बॉडी शेव्हिंग केल्यावर त्वचा कोरडी होते? नितळ त्वचेसाठी हे उपाय ठरतील फायदेशीर...
बॉडी शेविंग करताना कोणती काळजी घ्यायची, जाणून घ्या!
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 10:11 AM

धकाधकीच्या जीवनात त्वचेच्या समस्येने आपण सर्वच त्रस्त आहोत. आपल्या त्वचेबाबत (skin care) खासकरुन महिला प्रचंड जागृक असतात. महिला स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी अनेक उपाय योजनांचा अवलंब करतात. त्वचेला तजेलदार, मुलायम ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या ब्युटी प्रोडक्ट्सचाही वापर केला जातो. महिला अनेकदा ‘बॉडी स्क्रब’ (body scrub) आणि ‘रेझर’(razor) वापरतात. हा त्यांच्या सौंदर्य प्रसाधनांचा भागच बनला आहे. ही उत्पादने वापरण्यास जितकी सोपी आहेत तितकीच ती किफायतशीर आहेत. ‘एक्‍फोलिएशन’ केल्‍याने नितळ त्वचा ठेवण्यास मदत होते आणि शेविंग हा एक्‍स्फोलिएशनचा एक प्रकार आहे. या पध्दतीचा वापर करुन त्वचेवरील नको असलेले केस सहजपणे काढून टाकता येते, यासाठी ब्लेड वापर केला जातो. जेव्हा त्वचेवर शेव केली जाते (Bold Shaving) तेव्हा ते त्वचेचा वरचा थर देखील काढून टाकते. त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास देखील मदत होते, परंतु याचा सतत वापर होत असल्यास यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होण्याचा धोका निर्माण होउ शकतो.

1) त्वचा मुलायम करावी

शेव्ह करण्यापूर्वी, सर्वप्रथम आपल्या त्वचेचा बाह्य थर मुलायम करावा, जवळपास 10 मिनिटे कोमट पाण्यात राहिल्याने त्वचेवरील केस लवकर निघण्यास मदत होते. यासोबतच ‘रेझर बर्न’ होण्याची शक्यता कमी होते. शक्यतो, आंघोळीनंतरच केस काढा जेणेकरून पाण्याने आधीच त्वचा मऊ होण्यास वेळ मिळतो व नको असलेले केस कुठलाही त्रास न होता अलगद निघतात. तसेच जेव्हा आपण नको असलेले केस काढतो तेव्हा स्क्रब करुन त्वचेतील मृत पेशी आणि घाण पूर्णपणे स्वच्छ करा..

2) शेव्हिंग क्रीमचा वापर

महिलांनीही शेव्हिंग क्रीमचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. यामुळे मृत पेशी निघून जातात. जेव्हा पुरुष दाढी करता तेव्हा त्वचेच्या सर्वात बाहेरील थर देखील दाढीसोबत निघत असतो. पण जर तुम्हाला मऊ त्वचा हवी असेल आणि मॉइश्चरायझ करण्यासाठी क्रीम वापरत नसाल तर त्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच त्वचेवर रेझर फिरवण्यापूर्वी तुमच्याकडे क्रीम असल्याची खात्री करावी

3) या मार्गाचा अवलंब करा

केस काढताना, लक्षात ठेवा की केसांच्या वाढीच्या दिशेने फक्त एकाच स्ट्रोकमध्ये दाढी करा. त्याच जागेवर रेझर लावू नका आणि प्रत्येक वेळी तुमचा वस्तारा वापरताना स्वच्छ असल्याची खात्री करा. जेणेकरून कुठल्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही.

4) त्वचेला मॉइश्चरायझ करा

त्वचेला धुतल्यानंतर त्वचेला ‘हायड्रेट’ करणे खूप महत्वाचे आहे, यासाठी आपल्या शरीरावर मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन लावायला विसरू नका. त्वचेवर वस्तारा फिरवल्यानंतर त्वचेचे पोषण करणे महत्त्वाचे आहे. असे न केल्यास त्वचेची जळजळ तसेच ती कोरडी व काळी पडण्याचा धोका निर्माण होत असतो.

आरोग्यविषयक इतर बातम्या :

Kidney Stones: कोणतेही ऑपरेशन न करता सहज गळून जाईल किडनी स्टोन! या रसांचे करा नेहमी सेवन

3 माणसांमागे एकाचा NeoCovजीव घेतो! वुहानमधील शास्त्रज्ञांचा धडकी भरवणारा नवा अभ्यास काय सांगतो?

गरोदरपणात ‘ही’ लक्षणं आढळल्यास सावधान!, बाळावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.