Health | हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी कोलेस्ट्रॉल वाढीच्या या 3 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

तुम्हाला अचानक त्वचेत काही बदल दिसू लागले आहेत का? डोळ्यांखाली पिवळे डाग? हे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे असू शकते. तुम्हाला हाताच्या तळव्यावर आणि पायाखाली एक बारीक रेषा देखील दिसू शकते, परंतु हे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्याचे लक्षण असू शकते. यामुळे अशा लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

Health | हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी कोलेस्ट्रॉल वाढीच्या या 3 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!
Image Credit source: istockphoto.com
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 3:08 PM

मुंबई : कोलेस्ट्रॉलमुळे शरीरामध्ये अनेक समस्या (Problem) निर्माण होतात. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे एचडीएल आणि दुसरे एलडीएल. शरीरात एलडीएल किंवा खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढली की समस्या निर्माण होतात. कोलेस्टेरॉल हा रक्तातील पदार्थ आहे. जेव्हा वाईट कोलेस्टेरॉल (Cholesterol) वाढतो, तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन हृदयाच्या समस्या निर्माण करते. परंतु उच्च कोलेस्ट्रॉल पातळीमुळे हृदयाच्या समस्या निर्माण होतात. तुमच्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त आहे की नाही, हे समजण्यासाठी काही सामान्य लक्षणे (Symptoms) दिसतात. मात्र, आपल्यापैकी जवळपास सर्वच या लक्षणांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात. यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. उच्च कोलेस्टेरॉलची गंभीर गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पाहा कोलेस्टेरॉल वाढीची खालील लक्षणे

त्वचेचे डाग

तुम्हाला अचानक त्वचेत काही बदल दिसू लागले आहेत का? डोळ्यांखाली पिवळे डाग? हे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे असू शकते. तुम्हाला हाताच्या तळव्यावर आणि पायाखाली एक बारीक रेषा देखील दिसू शकते, परंतु हे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्याचे लक्षण असू शकते. यामुळे अशा लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

डोळ्यांच्या समस्या

जर तुम्हाला वाटत असेल की दृष्टीशी संबंधित कोणत्याही कारणाने डोळ्यांची समस्या आहे, तर तुमची चूक असू शकते. अनेक वेळा डोळ्यांची ही समस्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे असू शकते. अनेक वेळा ही लक्षणे हृदयविकाराची असतात. यामुळे अशावेळी सरळ सरळ डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

हात दुखणे

अनेक वेळा जास्त काम केल्यामुळे हात दुखत असल्याचे दिसून येते. पण ही लक्षणे हलक्यात घेऊ नका. तुम्हाला वारंवार हात दुखत असल्यास हे एलडीएल कोलेस्टेरॉलच्या पातळीत वाढ झाल्याचे लक्षण आहे. यामुळे रक्त परिसंचरण विस्कळीत होते तसेच एथेरोस्क्लेरोसिस होऊ शकतो. त्यामुळे ही लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांशी संपर्क साधा.

(वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.