वाढत्या वजनाला हलक्यात घेऊ नका! लठ्ठपणामुळे स्त्रियांना होणारे आजार कोणते?

दिवसेंदिवस महिलांमध्ये अति लठ्ठपणा व वाढते वजन ही समस्या जोर धरत आहे परंतु योग्य वेळी लक्षणे न जाणवल्यामुळे अनेक महिलांना भविष्यात वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते म्हणूनच या आजाराची नेमकी लक्षणे काय आहेत हे जाणून घेणार आहोत.

वाढत्या वजनाला हलक्यात घेऊ नका! लठ्ठपणामुळे स्त्रियांना होणारे आजार कोणते?
वाढत्या वजनाची वेळीच काळजी घ्या
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 7:40 PM

सध्या दैनंदिन जीवनामध्ये एक समस्या प्रामुख्याने पाहायला मिळत आहे ती म्हणजे अतिलठ्ठपणा (over weight). ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळते आणि अनेकदा महिला वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत असतात. आहाराचे मॅनेजमेंट करत असतात आणि एवढं सगळं करुन सुद्धा हवा तेवढा फरक जाणवत नाही. बहुतेक वेळा कमी वयातच महिलांचे शरीर सुटू लागते आणि शरीराचा आकार अगदी विचित्र होऊन जातो अशा वेळी अनेक महिला वेगवेगळे योगा, एक्ससाइज करत असतात परंतु त्यावर सुद्धा फारसा परिणाम जाणवत नाही म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपल्याला अतिलठ्ठपणा कशा पद्धतीने दूर करायचा आहे? लठ्ठपणा नेमका असतो तरी काय आणि स्त्रियांमध्ये याची आजार लक्षणे (disease symptoms in women’s ) प्रामुख्याने आपल्याला कोणकोणते आजार पाहायला मिळतात याबद्दलची माहिती प्राप्त करण्यासाठी तज्ञ डॉ.अश्विनी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले आहे. डॉ अश्विनी ह्या नावाजलेल्या ओबेसिटी कन्सल्टंट आहेत. गेल्या अठरा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉक्टर अश्विनी कार्य करत आहेत.भारतातील पहिल्या महिला ओबेसिटी कन्सल्टंट म्हणून डॉ.अश्विनी यांची जगभरात ख्याती आहे. सेवी अवॉर्ड मिळवणाऱ्या या पहिल्या होमिओपॅथी डॉक्टर आहेत. अतिलठ्ठपणावर आधारित अनेक समस्या (problems) यावर डॉक्टर यांनी संशोधन केलेले आहे. टिव्ही 9 मराठीशी बातचीत करताना त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली यामुळे अनेकांच्या मनांतील शंका नक्कीच दूर होतील चला तर मग जाणून घेऊया अतिलठ्ठपणा याबद्दल महत्वाची माहिती…

१) अनेकदा कमी जेवण करून देखील अतिलठ्ठपणा हा आजार आपल्याला उद्भवतो यामागील नेमकी कारणे काय आहेत?

अति लठ्ठपणा हा ओबेसिटी, वाढलेले वजन, शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात निर्माण झालेली चरबी या वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. अति लठ्ठपणाच्या बाबतीत भारत हा जगामधील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे म्हणूनच भविष्यातील लठ्ठपणाची समस्या सर्वांनाच उद्भवू नये यासाठी काळजी घेणे देखील करणे गरजेचे आहे. बहुतेक वेळा निर्माण झाल्यामुळे शरीराचा आकार बिघडू लागतो.हा आकार अनेकदा शरीरात झालेले हार्मोन्स बदल,अनुवंशिकता किंवा जर एखादी महिला एखादी ट्रीटमेंट घेत असेल तर गोळ्या औषधांमुळे सुद्धा अतिरिक्त वजन वाढू लागते.

२) अति लठ्ठपणा कशाप्रकारे मोजला जातो?

आपल्याकडे अति लठ्ठपणा शरीरामध्ये निर्माण झालेला आहे की नाही यासाठी काही मापक पद्धती वापरली जाते आणि आपल्या शरीरातील बीएमआयच्या माध्यमातून अतिलठ्ठपणाचे मोजमाप केले जाते.

बॉडी मास इंडेक्स BMI = weight (kg) / [height (m)]2

आपण आपला बॉडी मास इंडेक्स मोजमाप करण्याचे कारण म्हणजे जर आपण आपल्या शरीरातील बीएमआय तपासणी केली तर यामुळे आपल्या शरीरातील अतिलठ्ठपणा नेमक्या कोणत्या पातळीवर आहे, त्याचा स्तर काय आहे याबद्दलची अचूक माहिती आपल्याला कळू शकते. भविष्यात आपल्याला एखादा घातक आजार होणार आहेत की नाही याबद्दलची पूर्व सूचना देखील कळू शकते.

जर आपला BMI 25 असेल तर हा स्कोर नॉर्मल समजला जातो. हा स्कोर जर 25 ते 30 दरम्यान असेल तर याला आपण ओव्हर वेट असे समजतो. या काळात आपल्याला ब्लडप्रेशर डायबिटीज, हाय कॉलेस्ट्रॉल यासारख्या आजारांची हळूहळू लागण होण्याची शक्यता असते. जर आपला बीएमआय स्कोर 30 ते 40 दरम्यान असेल तर या स्तराला आपण ओबेसिटी असे समजतो, अशा परिस्थितीत आपल्या शरीरातील जे महत्वाचे अवयव आहेत ते डॅमेज होण्याची शक्यता असते आणि अशा परिस्थितीत गुडघे दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी सायटिका यासारखे आजार हळूहळू वाढू लागतात. जर आपल्या शरीराचा बीएमआय स्कोर 35 ते 40 च्या वर जात असेल तर हळूहळू आपल्या शरीरातील जे काही महत्त्वाचे अवयव आहेत म्हणजेच किडनी हार्ट ,लिव्हर,ब्रेन, या सगळ्या अवयांवर हळूहळू ताण निर्माण होऊ लागतो. या अवयवांची कार्यशीलता व कार्य गती हळूहळू कमी होऊ लागते आणि म्हणूनच अशा वेळी संपूर्ण शरीरामध्ये त्याचा विपरीत परिणाम आपल्याला जाणवू लागतो. ज्या व्यक्तींचा बीएमआय स्कोर हा 40 च्यावर जातो अशा व्यक्तींना भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.

3) स्त्रियांच्या शरीरात अतिलठ्ठपणा वाढण्याची कारणे नेमके कोणकोणते आहेत?

तसे पाहायला गेले तर स्त्रियांच्या शरीरात अतिलठ्ठपणा वाढण्याची कारणे अनेकदा अनुवंशिकता असते. जर तुमचे आई-वडील शरीराने धष्टपुष्ट असतील तर अशा वेळी जन्माला येणारी मुले सुद्धा शरीराने लठ्ठ असतात तसेच बहुतेक वेळा योग्य प्रकारचा व्यायाम न करणे, योग्य जेवणाची वेळ न पाळणे, कधीही केव्हाही काही पदार्थ खाणे आणि यामुळेसुद्धा शरीरावर ताण निर्माण होतो तसेच परिणामी पचन संस्था योग्य पद्धतीत कार्य करत नाही. अनेकदा काही आजार असे असतात की त्या आजारांमध्ये सुद्धा वजन वाढण्याची शक्यता असतेच जसे की थायरॉइड,पीसीओडी, पीसीओएस, काही हार्मोन्स ट्रिटमेंट जर एखादी महिला घेत असेल तर अशा वेळीसुद्धा अतिरिक्त प्रमाणामध्ये वजन वाढते.

4) अतिलठ्ठपणा निर्माण झाल्यामुळे स्त्रियांच्या शरीरात अन्य कोणकोणते गंभीर आजार होऊ शकतात ?

बहुतेक वेळा स्त्रियांच्या शरीरात अतिलठ्ठपणाची पातळी/ स्तर दिवसेंदिवस वाढल्यामुळे अनेकांना वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. जर अशा वेळी आपण काही लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर हे आजार भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू शकते आणि म्हणूनच हे नेमके आजार कोणकोणते आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे. वजन जर मर्यादेपेक्षा जास्त वाढत असेल तर अशा वेळी हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, मणक्यामध्ये गॅप येणे, गुडघ्यात गॅप येणे, हाडांचे विविध आजार होणे, हार्ट अटॅक, पॅरालीसीस वेरिगोव्हेन्स, इन फर्टीलिटी (वंध्यत्व), पिसीओडी त्वचेत फंगल इन्फेक्शन, स्ट्रेच मार्क दिसणे, अशा विविध प्रकारची आजारी भविष्यात होण्याची शक्यता असते परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर आपल्या शरीरातील दिवसेंदिवस वाढणारा अतिलठ्ठपणा तर आपण नियंत्रणात आणला नाही तर एखाद्या महिलेला 13 वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर देखील होऊ शकतात.

5) अति लठ्ठपणामुळे भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका असतो का ?

हो, नक्कीच!! जर एखाद्या महिलाचे वजन अतिरिक्त असेल, मर्यादेपेक्षा वजन नेहमीच वाढत असेल, वजन कमी होण्याचे नावच घेत नसेल तर अशा वेळी शरीरामध्ये निर्माण झालेल्या अतिलठ्ठपणा हा भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका निर्माण करू शकतो. बहुतेक वेळा महिलांच्या शरीरात कॅन्सर होण्याची वेगळी करणे देखील सुद्धा असू शकतात त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे पीसीओडी किंवा पीसीओएस समस्या. अति प्रमाणामध्ये वजन वाढल्यास त्याचा विपरीत परिणाम ओव्हरिज वर होतो. ओव्हरी कार्यात अडथळा निर्माण होतो.ओव्हमची व्यवस्थित वाढ होत नाही, पाळी वेळे वर येत नाही जरी पाळी वेळेवर आली तरी ब्लिडींग जास्त होते.वेळेवर उपचार न केल्यास महिलांना वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते.अनेकांना माहिती नसते कीमुलगी किंवा स्त्रियांच्या वाढलेल्या वजनामुळे वंध्यत्वाची समस्या भविष्यात निर्माण होऊ शकते.जर या सगळ्या समस्या वेळेवर हाताळल्या नाही तर विभिन्न प्रकारचा कॅन्सर नक्कीच होऊ शकतो अश्या वेळी डॉक्टरांना अवश्य भेटायला हवे.

टिप्स : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये तज्ज्ञांची मते सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

लिंबाचं अतिसेवन तुमच्यासाठी ठरु शकते धोकादायक! काय आहे कारण आणि होणारे दुष्परिणाम?

बहुगुणी हळद! हळदीचे हे औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का?

PCOS Cure : डॉक्टरांचा सल्ला ते डाएटिंग, PCOS पासून आयुष्यभराची मुक्ती; वाचा डॉक्टरांच्या टिप्स

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.