Hemoglobin Level: ‘या’ पेयांचे कराल सेवन तर पटकन वाढेल हिमोग्लोबिन

शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ते ॲनिमियाचे संकेत असतात.

Hemoglobin Level: 'या' पेयांचे कराल सेवन तर पटकन वाढेल हिमोग्लोबिन
Hemoglobin Level: 'या' पेयांचे कराल सेवन तर पटकन वाढेल हिमोग्लोबिन Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 3:42 PM

नवी दिल्ली: शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ते ॲनिमियाचे (anemia) संकेत असतात. बिघडलेली जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, किंवा इतर कारणांमुळे हिमोग्लोबिन लेव्हल (hemoglobin level) कमी होऊ शकते. मुबलक प्रमाणात लोह (iron rich drinks) असलेल्या पदार्थांचे किंवा पेयांचे सेवन करून तुम्ही शरीरातील रक्ताची कमतरता दूर करू शकता.

बीटाचा रस

ज्या लोकांना अशक्तपणा येतो किंवा त्यांची हिमोग्लोबिनची पातळी कमी आहे, त्यांनी बीटाचा रस जरूर प्यावा. बीट हे एक सुपरफूड आहे. कारण त्यामध्ये लोहाव्यतिरिक्त मॅग्नेशिअम, बेटेन आणि व्हिटॅमिन सी या सारख्या आवश्यक आणि पोषक घटकांचा समावेश आहे. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी बीट खावे किंवा त्याचा रस प्यावा.

प्लम ज्यूस

वाळलेल्या प्लम पासून बनवलेला हा रस प्यायल्याने हिमोग्लोबिनची पातळी झपाट्याने वाढू शकते. हा रस बनवण्यासाठी 4-5 कोरडे प्लम घेऊन ते पाण्यात भिजवून ठेवा. थोड्या वेळानंतर ते मिक्सरच्या भांड्यात टाकावे, व त्यामध्ये थोडा लिंबाच रस आणि 2 चमचे साखर मिसळावी. ते सर्व मिश्रण नीट एकत्र करून तो ज्यूस प्यावा. हा रस प्यायल्याने ॲनिमिया व्यतिरिक्त अशक्तपणा, थकवा आणि आरोग्याच्या इतर समस्याही दूर होतील

पालक व पुदीनाचा ज्यूस

ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते त्यांना डॉक्टर पालकाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. तुमचे हिमोग्लोबिन कमी असेल तर दररोज पालका व पुदीना एकत्र करून त्याच्या ज्यूसचे सेवन करावे. दिवसा हा रस प्यावा.

टोमॅटोचे सेवन

एखाद्या भाजीची चव वाढवणारा टोमॅटो हिमोग्लोबिनची पातळीही झपाट्याने वाढवू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात किमान 2 टोमॅटोचे सेवन केले पाहिजे.

जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टोमॅटोचा रस काढून तोही पिऊ शकता. तसेच तो सॅलॅडच्या स्वरूपात देखील खाता येऊ शकतो.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....