Health | उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी या फळांच्या रसाचे सेवन करा आणि दिवसभर ऊर्जावान राहा!
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी शरीरातील ऊर्जा वाढवणे अत्यंत आवश्यक आणि तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपण जास्तीत-जास्त नारळ पाण्याचे सेवन करायला हवे. कारण नारळ पाणी आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. नारळ पाण्याचे नियमित सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामामध्ये जीवाची लाहीलाही होते. यामुळे थकवा जास्त जाणवतो. तसेच या हंगामामध्ये हायड्रेटेड (Hydrated) राहणे देखील तितकेच महत्वाचे आहे. शरीराला थंड ठेवण्यासाठी आपण आहारामध्ये काही खास पेयांचा नक्कीच समावेश करायला हवा. ज्यामुळे आपले शरीर थंड राहिल. यामुळे प्रमुख म्हणजे फळांच्या रसाचा समावेश हवा. काही खास पेयांमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढण्यासही मदत होते. हे रस शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात. पॅकेज्ड ज्यूस आणि कोल्ड्रिंक्सऐवजी तुम्ही फळांचे रस घेऊ शकता. ते तुमच्या आरोग्याला कोणतीही हानी न पोहोचवता थंड करतात. उन्हाळ्यात (Summer) तुम्ही कोणत्या फळांचे रस सेवन करू शकता हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
कलिंगड
उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या दररोजच्या आहारामध्ये कलिंगडचा नक्कीच समावेश करा. कारण कलिंगडमध्ये जवळपास 90 टक्के पाणी असते. ज्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. डिहायड्रेशनची समस्या दूर ठेवायची असेल तर कलिंगडच्या रसाचा आहारात समावेश नक्की करा.
नारळ पाणी
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी शरीरातील ऊर्जा वाढवणे अत्यंत आवश्यक आणि तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपण जास्तीत-जास्त नारळ पाण्याचे सेवन करायला हवे. कारण नारळ पाणी आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. नारळ पाण्याचे नियमित सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
कैरी
आंब्याला फळांचा राजा देखील म्हटले जाते. या मोसमात तुम्हाला अनेक प्रकारचे आंबे पाहायला मिळतील. हे खूप चवदार असतात. तुम्ही आंब्याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही कैरीचे पन्ने देखील घेऊ शकता. कैरीच्या पन्नाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
संत्री
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये सकाळ्याच्या नाश्त्यामध्ये संत्रीच्या रसाचा समावेश करा. यामुळे दिवसभर आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. शिवाय आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. जर तुमच्याकडे संत्रीचा रस तयार करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही सकाळी साधी संत्री देखील नाश्त्यामध्ये घेऊ शकता.
ताक
उन्हाळ्याच्या हंगामात दररोजच्या दुपारच्या जेवणामध्ये ताकाचा समावेश करा. ताक पिणे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. ताकामुळे शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते. मात्र, बाहेरील ताक पिण्यापेक्षा घरीच ताक तयार करा आणि त्याचे सेवन करा. मात्र, शक्यतो ताकामध्ये अजिबात मीठ टाकू नका. हवं तर तुम्ही ताकामध्ये साखरेचा समावेश करू शकता.