Weight Loss | उन्हाळ्यात ही कमी कॅलरी पेय प्या आणि निरोगी राहण्यासोबतच वजन कमी करा!

चुकीचा आहार आणि खराब जीवनशैलीमुळे (Lifestyle) वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. आपल्यापैकी अनेकजण कामानिमित्त दिवसभर बाहेरच असतात, मग अशावेळी बाहेरील खाद्यपदार्थांचे अधिक सेवन केले जाते. तज्ज्ञांच्या मते बाहेरील चमकदार खाद्यपदार्थांमध्ये कॅलरीजचे (Calorie) प्रमाण अधिक असते.

Weight Loss | उन्हाळ्यात ही कमी कॅलरी पेय प्या आणि निरोगी राहण्यासोबतच वजन कमी करा!
उन्हाळ्यात ही पेय पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 10:52 AM

मुंबई : चुकीचा आहार आणि खराब जीवनशैलीमुळे (Lifestyle) वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. आपल्यापैकी अनेकजण कामानिमित्त दिवसभर बाहेरच असतात, मग अशावेळी बाहेरील खाद्यपदार्थांचे अधिक सेवन केले जाते. तज्ज्ञांच्या मते बाहेरील चमकदार खाद्यपदार्थांमध्ये कॅलरीजचे (Calorie) प्रमाण अधिक असते. यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. जड अन्नही उन्हाळ्यात पचायला सोपे नसते, कारण यासाठी शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त असावे लागते. पाण्याची कमतरता असेल तर बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रासही होऊ शकतो. यामुळे आपण आपल्या आहारामध्ये काही खास पेयांचा समावेश करायला हवा.

बीट आणि किवी

या दोन्ही गोष्टी जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहेत. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. बीट आणि किवीचे खास पेय तयार करून पिल्याने तुम्ही निरोगी राहू शकाल आणि शरीराला जास्त कॅलरीज मिळणार नाहीत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बीट आणि किवीच्या रसात टोमॅटोचा रस देखील टाकू शकता, टोमॅटोमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे तुमची त्वचा देखील चमकू शकते. यामुळे याचा उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आहारात समावेश करा.

काकडी आणि दही

असे म्हटले जाते की काकडीत सुमारे 96 टक्के पाणी असते आणि म्हणूनच उन्हाळ्यात ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. याचे सेवन केल्याने शरीर आतून हायड्रेट राहते, तर सेलेरी आपली पचनक्रिया सुधारण्याचे काम करते. काकडीचे काही तुकडे आणि एक वाटी दही मिक्स करा आणि ज्यूस तयार करा. यामुळे तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमी राहणार नाही.

नारळाचे पाणी

नारळाच्या पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स शरीराला दीर्घकाळ हायड्रेट ठेवू शकतात. डॉक्टर देखील उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिण्याची शिफारस करतात, ते म्हणतात की ते नियमितपणे सेवन केल्याने पोटात उष्णता निर्माण होत नाही आणि आपली त्वचा चांगली राहण्यास मदत होते. नारळाचे पाणी कमी-कॅलरी पेय मानले जाते कारण त्यात कॅलरीज असतात. हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips : उन्हाळ्यातील या चुकांमुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते, वाचा महत्वाचे!

Weight Loss : तुम्हाला वजन कमी करायचे मग या 4 चुका टाळा आणि झटपट वजन कमी करा!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.