Health Care : उन्हाळ्याच्या हंगामामध्ये अति थंड पाण्याचे सेवन करणे टाळाच, वाचा महत्वाचे!
गेल्या काही वर्षांपासून तापमानात वेगाने वाढ होत आहे. हवामान (Weather) बदलामुळे तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. बहुतेकांनी उष्णतेच्या लाटेत थंड राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उष्ण वातावरणात तहान भागवण्यासाठी बरेच लोक थंड पाणी आणि पेय (Drinks) पिण्यावर जास्त भर देतात. मात्र, या थंड पाण्याचा शरीरावर किती वाईट परिणाम होतो हे अनेकांना माहीत नसेल.
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून तापमानात वेगाने वाढ होत आहे. हवामान (Weather) बदलामुळे तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. बहुतेकांनी उष्णतेच्या लाटेत थंड राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उष्ण वातावरणात तहान भागवण्यासाठी बरेच लोक थंड पाणी आणि पेय (Drinks) पिण्यावर जास्त भर देतात. मात्र, या थंड पाण्याचा शरीरावर किती वाईट परिणाम होतो हे अनेकांना माहीत नसेल. या संदर्भात जाणून घ्या, आयुर्वेदिक पद्धतीने थंड पाण्याचा काय परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते थंड पाणी (Cold water) प्यायल्याने शरीरात पचनाचे विकार होतात. पचनाच्या समस्यांमुळे अन्नातील आवश्यक पोषक घटक पेशींमध्ये शोषले जात नाहीत. यामुळेच जर तुम्हीही थंड पाण्याचे सेवन करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे.
पचनसंस्थेवर वाईट परिणाम
तज्ज्ञ नेहमीच थंड पाणी न पिण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्याच्या काळात आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 36 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. वातावरणातील तापमानानुसार ते बदलते. शरीराच्या सर्व यंत्रणा शरीराच्या तापमानात अचानक बदल झाल्यामुळे प्रतिक्रिया देऊ लागतात. यामुळेच थंड पाणी पिणे टाळा. कधीकधी पचनासाठी आवश्यक एन्झाईम्सचे उत्पादन आणि नसा, रक्तवाहिन्या संबंधित अवयवांचे कार्य व्यवस्थित काम करत नाही. जर आपल्याला खूपच थंड पाणी पिण्याची इच्छा होत असेल तर थंड पाण्यामध्ये साधे पाणी मिक्स करूनही आपण घेऊ शकतो.
हृदय गती कमी होऊ शकते
जास्त थंड पाणी प्यायल्याने हृदय गती कमी होते. हे व्हॅगस मज्जातंतूला देखील उत्तेजित करते, जे मज्जासंस्थेचा एक भाग आहे. पाण्याची कमी तापमानाचा थेट परिणाम व्हॅगस नेव्हवर होत असल्याने पाण्याचा शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. ही एक गंभीर समस्या असू शकते. यामुळे हृदय गती कमी होणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात. यामुळेच थंड पाणी पिणे आपल्या तोंडाला चांगले वाढते. मात्र, त्याचे घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर)
संबंधित बातम्या :
Skin | पाठीवरील पिंपल्स-पुरळाने हैराण आहात? मग पुदीना आणि कोरफडचे जादूई उपयोग नक्की वाचा!
Health | उन्हाळ्याच्या हंगामामध्ये किती ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा सविस्तरपणे!