Excess Of Milk: दुधाच्या अतिसेवनामुळे होऊ शकतो ‘हा’ जीवघेणा आजार ?

दूध हे आपल्या शरीरासाठी पोषक मानले जाते. मात्र हेच दूध गरजेपेक्षा जास्त प्यायले गेल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का ?

Excess Of Milk: दुधाच्या अतिसेवनामुळे होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार ?
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 10:53 AM

नवी दिल्ली – शरीरातील कॅल्शिअमचा पुरवठा करण्यासाठी दूध (milk) हे नेहमीच एक उत्तम स्त्रोत मानले जाते. दूध व इतर दुग्धजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, हे आपण सर्वांनी लहानपणापासूनच ऐकलं असेल. याच कारणामुळे लहानपणापासून आपल्याला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. मात्र एखादी गोष्ट अती केल्यास किंवा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात केल्यास ते हानिकारक ठरू शकते. दुधाचेही तसेच आहे. आपण गरजेपेक्षा जास्त प्रमाात दुधाचे (excess of milk) सेवन करत असाल तर त्याचे अनेक घातक परिणामही (side-effects) होऊ शकतात.

शरीर सुस्त होणे

हे सुद्धा वाचा

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना दूध आवडते, मात्र काही लोक असेही असतात, ज्यांना दूध आवडत नाही किंवा त्याची ॲलर्जी असते. अशावेळी दुधाचे अतिसेवन केल्यास ते अशा लोकांसाठी अपायकारक ठरू शकते. अनेक वेळा दूध प्यायल्याने अस्वस्थ वाटणे, मळमळ, थकवा येणे आणि सुस्ती येणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. दुधात ए 1 कॅसिइन आढळते, ज्यामुळे कधीकधी आतड्यांमध्ये जळजळ होणे, अशा समस्या देखील उद्भवू शकतात.

पचनाची समस्या

दूध प्यायल्याने आपलं पोट भरतं. मात्र हेच दूध अतिप्रमाणात प्यायल्यास अनेक वेळेस आपल्याला मळमळणे किंवा अस्वस्थ वाटणे, असा त्रास होऊ शकतो. खरंतर दूध हे पचायला जड असतं त्यामुळे ते पचण्यास देखील जास्त वेळ लागतो. त्यामुळे अती दूध प्यायल्यास पचनाची समस्या निर्माण होऊ शकते.

हाडे कमकुवत होणे

हाडांच्या वाढीसाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी दूध हा एक उत्तम स्रोत आहे, असे मानले जाते. पण दुधाचे अतिसेवन केल्यास त्याचा उलट परिणामही होऊ शकतो. 2014 साली ब्रिटीश मेडिकल जर्नल (बीएमजे) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळले की, ज्या लोकांनी कमी दूध प्यायले त्यांना हाडं मोडण्याचा किंवा जळजळ होण्याचा त्रास होण्याची शक्यता कमी असते.

त्वचेच्या समस्या

जास्त प्रमाणात दुधाचे सेवन केल्याने त्वचेसंदर्भातील समस्यादेखील उद्भवू शकतात. त्यामुळे आपला चेहरा अथवा त्वचेचा इतर भागावर पुरळ अथवा ॲलर्जी होऊ शकते.

कॅन्सरचा धोका

हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण एका अभ्यासानुसार, कॅल्शियम युक्त दुधाचा अतिरेक झाल्यास प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. 2007 साली अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चच्या एका अहवालातून ही माहिती समोर आली. त्याशिवाय दुधात लॅक्टोज नावाची साखर असते, ज्याच्या अधिक सेवनाने महिलांमध्ये अंडाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, असे एनसीबीच्या 2012 साली प्रकाशित झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले होते.

हृदयरोगाचा धोका

ब्रिटिश मेडिकल जर्नल (बीएमजे) मध्ये 2014 साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळले की, जास्त दूध पिण्यामुळे महिला आणि पुरुष या दोघांमध्येही हृदयरोगाचा धोका वाढतो. या अभ्यासानुसार, जे पुरुष दिवसातून 3 ग्लास किंवा त्यापेक्षा जास्त दूध पितात, त्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका 10 टक्क्यांनी वाढू शकतो.

एका दिवसात किती दूध पिणे गरजेचे ?

वरती नमूद केलेले मुद्दे वाचून तुमच्या हे लक्षात आले असेल की दुधाचे अतिरिक्त सेवन हे शरीरासाठी अनेक प्रकारे घातक ठरू शकते. अशा परिस्थितीत जेवढे आवश्यक आहे तेवढेच दूध पिणे इष्ट ठरते. तज्ज्ञांच्या मते एका व्यक्तीने दिवसभरात 1 किंवा 2 ग्लास दूध प्यायले पाहिजे. त्याशिवाय तुम्ही पनीर, ताक, दही या दुग्धजन्य पदार्थांच्या स्वरूपात दुधाचे सेवन करू शकता.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.