EYE | धूम्रपानामुळे दृष्टी कमी होऊ शकते किंवा अंधत्‍व येऊ शकते, जाणून घ्या महत्वाची माहिती!

धूम्रपानामुळे व्‍यक्‍तींमध्‍ये एज रिलेटेड मॅक्‍युलर डि‍जरेशन होण्‍याचा धोका वाढतो, ज्‍यामध्‍ये अत्‍यंत बारीक वस्‍तू पाहण्‍यास मदत करणा-या मॅक्‍युलाची स्थिती अधिक बिकट होते. याचा प्रत्‍यक्ष दृष्टीवर परिणाम होतो आणि अंधुक दिसणे, विकृती आणि दृष्टीच्‍या मध्‍यभागी ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट्स अशी लक्षणे दिसून येतात. तंबाखू डोळ्यातील पडद्यामधील रक्‍तप्रवाहात व्यत्यय आणते आणि त्यामुळे मॅक्युलर डिजनरेशन होते.

EYE | धूम्रपानामुळे दृष्टी कमी होऊ शकते किंवा अंधत्‍व येऊ शकते, जाणून घ्या महत्वाची माहिती!
Image Credit source: istockphoto.com
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 7:00 AM

मुंबई : ग्‍लोबल अडल्‍ट टोबॅको सर्वे (जीएटीएस)नुसार भारतात तंबाखूचे सेवन अगदी सामान्‍य झाले आहे आणि भारतात (India) 267 दशलक्ष व्‍यक्‍तींना तंबाखूचे व्‍यसन आहे. लोकांना तंबाखू सेवनाचे हृदय, श्‍वसनसंस्‍था इत्‍यादींवर होणारे घातक परिणाम माहित असताना देखील अनेक लोक तंबाखूचे सेवन (Intake) करतात. तंबाखूच्‍या व्‍यसनामुळे डोळ्यांवर परिणाम होण्‍यासोबत दृष्टी कमी होऊ शकते. तज्ञांनी धूम्रपान आणि दृष्टी जाण्‍याच्‍या कारणांदरम्‍यान असलेल्‍या प्रत्‍यक्ष संबंधांचा अभ्‍यास केला आहे. मुंबई रेटिना सेंटरचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व विट्रेओरेटिनल सर्जन डॉ. अजय दुदानी म्‍हणाले, धूम्रपानामुळे (Smoking) डोळ्यांना त्रास होण्‍यासोबत जळजळ होऊ शकते. धूम्रपानामुळे तीन डोळ्यांचे आजार होण्‍याचा व ते अधिक बिकट होण्‍याचा धोका आहे आणि ते तीन आजार म्‍हणजे एएमडी, मोतीबिंदू व काचबिंदू हे आहेत.

धूम्रपानाचा डोळ्यांवर परिणाम होऊ शकण्‍याची कारणे

धूम्रपानामुळे व्‍यक्‍तींमध्‍ये एज रिलेटेड मॅक्‍युलर डि‍जरेशन होण्‍याचा धोका वाढतो, ज्‍यामध्‍ये अत्‍यंत बारीक वस्‍तू पाहण्‍यास मदत करणा-या मॅक्‍युलाची स्थिती अधिक बिकट होते. याचा प्रत्‍यक्ष दृष्टीवर परिणाम होतो आणि अंधुक दिसणे, विकृती आणि दृष्टीच्‍या मध्‍यभागी ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट्स अशी लक्षणे दिसून येतात. तंबाखू डोळ्यातील पडद्यामधील रक्‍तप्रवाहात व्यत्यय आणते आणि त्यामुळे मॅक्युलर डिजनरेशन होते. धूम्रपानामुळे होणा-या ऑक्सिडेशनचा मॅक्युला पेशींवरही परिणाम होतो. एएमडी होण्‍याचा धोका कमी करण्‍याचा मार्ग म्‍हणजे धूम्रपान न करणे; रेटिनल आजारांमुळे दृष्टी कमी झाल्‍यास त्‍यावर उपचार होऊ शकत नाही. पण वेळेवर निदान केले तर रेटिनल आजारांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येऊ शकते.

धूम्रपान करणा-यांना धूम्रपान न करणा-यांच्‍या तुलनेत एएमडी होण्‍याची तीन ते चार पट शक्‍यता असते. धूम्रपान करणा-यांसोबत राहणारे धूम्रपान न करणा-यांना एएमडी होण्‍याचा दुप्‍पट धोका असतो. अशा बहुतांश केसेसमध्‍ये वेळेवर पुरेशी काळजी घेतली नाही तर कायमस्‍वरूपी अंधत्‍व येऊ शकते. तसेच तंबाखूच्‍या धुराचा डोळ्यांभोवती असलेल्‍या उतींवर देखील परिणाम होऊ शकतो, ज्‍यामुळे पापण्‍यांचा विकार होऊ शकतो आणि डोळ्यांखाली सूज येऊ शकते, असे पुण्‍यातील इनसाइट व्हिजन फाऊंडेशन येथील वैद्यकीय संचालक डॉ. नितीन प्रभुदेसाई म्‍हणाले.

डायबेटिक रेटिनोपॅथी

धूम्रपानामुळे मधुमेह होण्‍याचा धोका वाढू शकतो. धूम्रपानामुळे मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींना मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करणे अधिक अवघड जाऊ शकते. धूम्रपानामुळे मधुमेहाच्‍या जटिलता अधिक बिकट होऊ शकतात. ”सिगारेट्समधील रसायनांचा शरीरातील पेशींवर घातक परिणाम होतो आणि जळजळ होते. तसेच निकोटिनमुळे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांमध्‍ये वाढ होण्‍यासोबत त्‍यावर नियंत्रण ठेवणे अवघड झाल्‍याने पेशी इन्‍सुलिनला प्रतिसाद देत नाहीत. धूम्रपान करणा-या मधुमेही व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेचे प्रमाण लक्ष्‍य पातळ्यांपर्यंत ठेवण्‍यासाठी इन्‍सुलिनच्‍या उच्‍च डोसेसची गरज लागते. यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते आणि परिणामत: डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ शकते,” असे डॉ. प्रभुदेसाई पुढे म्‍हणाले.

”डायबेटिक रेटिनापॅथी असलेल्‍या रूग्‍णांनी धूम्रपान टाळावे, कारण भविष्‍यात जटिलतांमध्‍ये वाढ होऊ शकते. अशा स्थितीत धूम्रपानामुळे रूग्‍णांना त्‍यांच्‍या अगोदरच कमकुवत झालेल्‍या रक्‍तवाहिन्‍या व डोळ्यांमधील मज्जातंतू अधिक खालावण्‍याचा धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेण्‍यासारखी आहे की, पूर्वी धूम्रपान करणा-या व्‍यक्‍तींना धूम्रपान कधीच न केलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या तुलनेत नेहमीच अधिक धोका असेल, कारण काही नुकसान अगोदरच झालेले असते. उपचाराचे काटेकोरपणे पालन, नियमितपणे डोळ्यांची तपासणी आणि धूम्रपान सोडणे हे डोळ्यांचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी प्रमुख घटक आहेत,” असे डॉ. दुदानी पुढे म्‍हणाले.

दृष्टी कमी होण्‍यास प्रतिबंध करण्‍यासाठी काय करावे

 धूम्रपान सोडा!  नियमितपणे डोळ्यांची तपासणी करा आणि उपचारांचे काटेकोरपणे पालन करा  हिरव्‍या पालेभाज्‍या, फळे आणि जीवनसत्त्‍व क, ई व बीटा कॅराटिनचे उच्‍च प्रमाण असलेले खाद्यपदार्थ  रक्‍तदाब व कोलेस्‍ट्रॉलवर नियंत्रण ठेवा  सक्रिय राहा

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.