सोशल मीडियामुळे मुलांच्या आरोग्यावर होतोय परिणाम, मानसिक स्वास्थ्यही बिघडले!

सोशल मीडियाचे लागलेले व्यसन मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. ते वारंवार आपले फेसबूक आणि इन्स्टाग्राम चेक करत असतात. सोशल अकाऊंट वारंवार बघण्याची ही सवय मानसिक स्वास्थ्य बिघडवू शकते.

सोशल मीडियामुळे मुलांच्या आरोग्यावर होतोय परिणाम, मानसिक स्वास्थ्यही बिघडले!
Social media side effectsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 3:20 PM

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे (corona) सर्वजण घरी होतो. लहान मुलंही बराच काळ घरात बसून होती. त्यात त्यांचा अभ्यासही ऑनलाइन पद्धतीने होत होता, ज्यासाठी मुलांना बराच काळ स्मार्टफोन आणि लॅपटॉपचा वापर करावा लागला. बाहेर जाता येत नसल्याने मुलांनी अभ्यासाशिवाय मनोरंजनासाठीही स्मार्टफोनचा (smartphone) आधार घेतला. मात्र आता हीच गॅजेट्स मुलांसाठी मोठा धोका ठरत आहेत. मुल आता या गॅजेट्सचा उपयोग सोशल मीडियाच्या (social media)वापरासाठी करत आहेत. फेसबूक,इन्स्टाग्रामचा वापर खूप वाढला आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्यांची तब्येत (side effect on health) खराब होत आहे. सोशल मीडियाच्या अति वापरामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर (mental health) धोकादायक परिणाम होत आहेत.

स्मार्ट फोनच्या व्यसनामुळे मुले हिंसक होत असून त्यांच्या झोपेच्या पद्धतीत बिघाड झाला आहे. अनेक मुलं बऱ्याच वेळेस आई-वडिलांपासून लपवूनही सोशल मीडियाचा वापर करत असतात.

इंग्लंडमधील डी मॉन्टफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, वयाच्या 10 व्या वर्षी मुलांची सोशल मीडियावरील सक्रियता झपाट्याने वाढली आहे. ही मुलं दररोज सुमारे पाच तास सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यासाठी दिवसभरात तीन तास तर रात्री दोन तास खर्च होतात.

सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहण्याचं प्रमुख कारण म्हणजे लहान मुलं प्रसिद्ध व्यक्तींमुळे प्रभावित होतात आणि सोशल मीडियावरील त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटला फॉलो करतात. तसेच मुलांना आपले इतर मित्र काय करतात हेही जाणून घ्यायचं असतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट रहायचं असतं.

अनेकदा गेम खेळण्यासाठीही मुलांकडून स्मार्ट फोनचा वापर केला जात आहे. मुलांना गेम खेळण्याचे व्यसन लागल्यामुळे ते तासनतास फोनवर घालवत असल्याची अनेक प्रकरणं पाहायला मिळत आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थित असताना हे प्रकार अधिक घडत आहेत.

या संशोधनात सहभागी झालेल्या वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, 10 वर्षांपर्यंतच्या मुलांवर संशोधन करण्यात आले. त्यांच्याकडे स्वत: चा (पर्सनल) फोन होता. जगभरात काय घडत आहे, आपले मित्रमंडळी काय करत आहेत, हे त्या मुलांना सोशल मीडियाद्वारे जाणून घ्यायचे होते.

सोशल मीडियाच्या व्यसनामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राज कुमार यांच्या मते, मुलं वारंवार आपले फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटचे न्यूज फीड तपासतात.

अनेक वेळा तर असे होते की ते दर 10 ते 15 मिनिटांनी हे करत राहतात. सोशल मीडियावरील ही अकाउंट्स पुन्हा पुन्हा बघण्याची ही सवय मानसिक स्वास्थ्य बिघडवू लागते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, Fear of missing out (FOMO) चा धोकाही वाढतो. ही मुलं सोशल मीडियाच्या जगाकडे वास्तवातील जीवन म्हणून पाहू लागतात.

सोशल मीडियाच्या वापराव्यतिरिक्त मुलांमध्ये गेम खेळण्याचे व्यसनही लक्षणीयरित्या वाढलं आहे. गेल्या काही महिन्यांत देशभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत की, मोबाईलवर गेम खेळण्यास परवानगी दिली नाही म्हणून मुलाने आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीची हत्या केली.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मोबाईलवरील गेमच्या व्यसनामुळेही मुलांची विचार करण्याची क्षमता कमकुवत होत आहे. अनेकदा मुले खेळाचा भाग म्हणून बाहेरच्या जगाचा विचार करू लागतात आणि स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालतात. गेम खेळल्यामुळे मुलांमध्ये झोपेचा आजारही होत आहे.

सोशल मीडियाच्या वाढत्या व्यसनामुळे मुलांची शारीरिक हालचाल कमी होत आहे. शाळेतून आल्यानंतर मुलं बहुतांश वेळ फोनवरच घालवतात. शारीरिक हालचालीच्या अभावामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. कंबरदुखी आणि थकवा येणे, अशा समस्या मुलांमध्ये दिसून येत आहेत.

या सर्वांमध्ये मुलांमधलं सोशल मीडियाचं वाढतं व्यसन कसं कमी करता येईल, ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. कारण आतापासूनच हा प्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलली नाहीत तर भविष्यात हे व्यसन मोठा धोका ठरू शकतो.

याबाबत डॉ. राजकुमार यांनी सांगितले की, हे व्यसन सोडवण्यासाठी पालकांनी मुलांच्या दैनंदिन कामांवर लक्ष ठेवायला हवं. मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कामांसाठी फोन किंवा लॅपटॉप देऊ नये.

तसेच त्यांच्या फोन वापराची एक वेळ निश्चित करा. जर तुमच्या मुलांच फोनवर काहीही काम नसेल तर त्यांना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

मुलांना बाहेर खेळण्याची सवय लावा, रोज संध्याकाळी त्यांना मैदानावर किंवा बागेत खेळायला घेऊन जावे. त्याची शारीरिक हालचाल, ॲक्टिव्हिटी वाढली, तर मुलांचा फोनचा वापर आपोआप कमी होत जाईल.

मुलं घरात सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे तुम्ही पाहिले तर ते बंद करा आणि त्यामुळे होणारे नुकसान, याबद्दल मुलांना मार्गदर्शन करा.

मोकळ्या वेळेत मुलांना काहीतरी नवीन शिकण्याची प्रेरणा द्या. तुम्ही त्यांना डान्स क्लास किंवा स्विमिंगसाठी नेऊ शकता. मुलांना फावल्या वेळात फोनपासून दूर ठेवा आणि त्यांच्याशी बोत रहा. दिवसभर काय केले याबद्दल गप्पा मारा.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....